सांगलीत कृष्णा नदीत स्वच्छता मोहिम

सांगलीत कृष्णा नदीत स्वच्छता मोहिम

सांगली - येथे आज कृष्णा नदीमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ही मोहीम आयोजित केली होती. नदी पात्रात उतरून केंदाळ काढण्यात आले. निर्माल्य, प्लास्टीक पिशव्या बाहेर काढल्या. कचरा गोळा केला. सुमारे एक टन कचरा यावेळी नदीतून काढण्यात आला.   

येत्या अडीच वर्षात नदी पुर्णतः प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. यावेळी शेखर इनामदार यांनी नदीच्या स्वच्छतेबाबत नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोहीम कशी राबवणार याची माहिती दिली.

कृष्णेची स्वच्छता हा महापालिकेचा प्राधान्यक्रमाचा विषय असेल. येणाऱ्या बजेटमध्ये कृष्णा प्रदूषण मुक्त अभियानासाठी भरीव निधी देण्यात येणार असून पुढील अडीच वर्षात सर्व नदी पात्र प्रदूषणमुक्त करण्याचा मानस आहे. 

- संगिता खोत, महापौर

या मोहिमेत उपमहापौर धीरज सूर्यवंशी , स्थायी समिती सभापती अजिक्य पाटील  प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक संजय कुलकर्णी , सुब्राव मद्रासी सहभागी झाले होते.  या मोहिमेत सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले.

सर्व नगरसेवक उद्यापासून आयर्विन पुलावर थांबून  निर्माल्य नदीत टाकणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधन करणार आहेत. तसेच यापुढे दर मंगळवारी स्वछता मोहीम राबवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com