इंदापूर तालुक्यातील युवकांची रायगडावरती स्वच्छता मोहिम

राजकुमार थोरात
गुरुवार, 7 जून 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महाराज प्रतिष्ठानच्या युवकांनी रायगडवरती  प्लॉस्टिक मोहिम राबवून प्लॉस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केल्या.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील महाराज प्रतिष्ठानच्या युवकांनी रायगडवरती  प्लॉस्टिक मोहिम राबवून प्लॉस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केल्या.

बुधवार (ता.६) रोजी रायगडावरील शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातुन महाराज प्रतिष्ठानचे ७५० युवक गेले होते. रायगडावरती कार्यक्रमामध्ये राज्यातुन लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक नागकरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी प्लॉस्टिक बाटल्यांचा वापर केला होता. पाणी पिवून झाल्यानंतर अनेकांनी पाण्याच्या बाटल्या गडावरती फेकुन दिल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील युवकांनी फेकलेल्या बाटल्या गोळा करण्याचे काम सुरु केले. सुमारे तीन तास युवक गडावरती पाण्याच्या रिकाम्या बाटल्या शोधून एकत्र करीत होते. 

यामध्ये जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, वालचंदनगर मधील महाराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष बबलू पवार, अनिकेत रणमोडे ,महेंद्र जगताप, अजय सपकळ, राहूल रणमोडे, संजय रणमोडे,अमोल देवकर, अनिकेत रणमोडे, शशिकांत रकटे, दिग्विजय बलवंड, प्रकाश साळंखे, गणेश शिंगाडे, पांडुरंग जाधव, तुषार गायकवाड, प्रदिप साखरे, शिवाजी सावंत, श्रीनिवास फडतरे यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये भवानीनगर उद्घट, चिखली, कुरवली, रणगांव, वालचंदनगर, कळंब, शिरसटवाडी, बेलवाडी, पंधारवाडी, हिंगणगाव, तरटगांव, बाभुळगांव, सरडेवाडी, डाळज न.२,शेळगांव, निमसाखर, लासुर्णे, घोरपडवाडी, तावशी, डाळज न.३, खोरोची, बोराटवाडी परीसरातील युवकानी सहभाग घेतला.

Web Title: Cleanliness campaign by youths of Indapur taluka on raygad