शौचालयांवर झळकणार आता स्वच्छता संदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

जागतिक बॅंकेनेही प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेला 40 लाखांचे अनुदान दिले आहे.

सातारा : स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी केंद्र, राज्य शासन सातत्याने नवनवे उपक्रम राबवत आहे. त्यास जागतिक बॅंकेनेही प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेला 40 लाखांचे अनुदान दिले आहे. त्यातून शौचालये रांगविली जाणार असून, त्यावर स्वच्छता संदेशही लिहिले जाणार आहेत. 
सातारा जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानात देशात डंका वाजविला आहे. हे यश टिकविण्यासाठी जिल्हा परिषद, नागरिकांना प्रयत्नरत राहावे लागत आहे. वैयक्‍तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट साधल्यानंतर आता त्यांचे वापर नियमित होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना करावे लागत आहे. स्वच्छता अभियानाला बळकटी देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यास जागतिक बॅंकेकडूनही हातभार मिळत आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकांसाठी शौचालयांचा वापर होण्यासाठी 40 लाख 22 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील पाच हजार 460 कुटुंबीयांना होणार आहे. त्यातून या शौचालयांची रंगरंगोटी केली जाणार आहेत. तसेच त्यावर स्वच्छतेच्या अनुषंगाने संदेशही दिले जाणार आहेत. त्यासाठीचा निधी पाणी व स्वच्छता विभागाने ग्रामपंचायतींकडे वर्ग केला आहे.
तालुकानिहाय कुटुंबांची संख्या अशी : सातारा 663, कोरेगाव 454, खटाव 358, माण 505, फलटण 1267, खंडाळा 100, वाई 234, जावळी 89, महाबळेश्‍वर 115, कऱ्हाड 1300, पाटण 375. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness message now on toilets