शिर्डीसह 25 गावांत कडकडीत बंद, दर्शन सुरळीत

Close to 25 villages including Shirdi
Close to 25 villages including Shirdi

शिर्डी : पाथरीकरांनी केलेला साईजन्मभूमीचा दावा तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिर्डीकरांनी आज (रविवारी) कडकडीत बंद पाळला आहे. परिसरातील 25 ग्रामस्थांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मात्र रिघ कायम आहे. प्रसादालयही उघडे ठेवण्यात आले आहे. आज सकाळी गावकऱ्यांनी सदभावना रॅली काढली. साईबाबांसंदर्भात गाव बंद ठेवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शंकराचार्यांनी बाबांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्या निषेधार्थ शिर्डीकरांनी बंद पाळला होता. आज सकाळी काढलेल्या सदभावना रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पाथरी ही साईजन्मभूमी आहे, हे वादग्रस्त विधान जोपर्यंत मागे घेत नाहीत. तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवत नाहीत, तोपर्यत शिर्डी व परिसरातील गावे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. शहर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते. 
पाथरीला निधी देण्यास विरोध नाही. मात्र, हे गाव साईजन्मभूमी नाही, असे जाहीर करावे. इतर आठ ठिकाणी साईजन्मभूमी असल्याचा दावा केला जातो. हे दावे कायमस्वरूपी फेटाळले जावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा मागे घ्यावा, असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. 

काल झालेल्या ग्रामसभेसाठी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, दिलीप संकलेचा, विजय जगताप, जगन्नाथ गोंदकर, गनीभाई पठाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com