सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन आज (ता.08) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हवाई दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली.

कोल्हापूर : सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन आज (ता.08) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हवाई दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली.

मुख्यमंत्र्यांमनी पूरपरिस्थितीचा अंदाज घेतला, त्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गेले दोन-तीन दिवस सातत्याने केंद्र सरकारशी चर्चा करून मदत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. देशभरतील केरळ, गोवा, गुजरात राज्यातील टीमकडून मदत घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

सांगलीतील परिस्थिती सर्वाधिक भीषण 
सांगली शहराला पाण्याचा प्रचंड वेढा असून जवळजवळ सर्व सांगली शहर पाण्यात गेल्याची स्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नेव्हीच्या दोन टीम सोबत एनडीआरएफसह सैन्यांच्या काही टीम आपण मुख्यतः सांगलीसाठी दिल्या असून आणखी 05 टीम आपण सांगलीसाठी देण्याच्या प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सांगलीतील घटना दुर्देवी
ग्रामपंचायतीने लोकांना बाहेर काढण्यासाठी एक बोट दिली होती. ती बोट पलटल्याने काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अचूक आकडा माहित नाही पण एकूण 30 ते 35 लोकांनी या बोटीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. त्यामध्ये बोट पलटी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला असून काही लोक पाण्यात अडकले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कराडची परिस्थिती नियंत्रणात असून कोल्हापूरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. कोल्हापूरातील दोन-तीन लोकांची भेट घेऊन माहिती घेतली असता कोल्हापूरातील 223 गावे पूरांमुळे बधित आहेत. एकूण 60 बोटीमार्फत मदत कार्य चालू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोल्हापूरातील एकूण 3813 घरे बधित आहेत. त्यातील 89 घरे पूर्णपणे बधित असून पाणी ओसरल्यावर अचूक आकडा समोर येईल. पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर त्यांना योग्य ती मदत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरच्यांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील 390 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्या लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM devendra fadanvis Press conference in kolhapur after Air surveys