Shahaji Bapu Patil : काय झाडी, काय डोंगर.. शहाजी बापूंची दौलतनगरात तुफान डायलॉगबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde Daulnagar meeting at Shahaji Bapu Patil politics Shashan Aaplya Dari

Shahaji Bapu Patil : काय झाडी, काय डोंगर.. शहाजी बापूंची दौलतनगरात तुफान डायलॉगबाजी

दौलतनगर : काय डोंगर, काय झाडी या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉग बाजीने आज दौलनगरची सभा जिंकली. दौलनगर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी योजनेचा प्रारंभ आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना आमदार पाटील यांना भाषण करायला सांगितले.

तुफान डायलॉग बाजी करत शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित्यांची मने जिकली. आमदार पाटील म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री पदाचे बाशिंग घेऊन फिरतंय नव्हरा काय त्यांना मिळेना अशी स्थिती झाली आहे.

उद्धव ठाकरे आणि. अजित पवार यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री निधीतून दोन अडीच कोटी वाटले पण मुख्यमंत्री एकनाथ शिं,दे यांनी नऊ महिन्यात 67 कोटी रुपये वाटले. शिवसेनेची पतका खंड्यावर घेऊन 1 लाख मतांनी शंभूराज देसाई यांना निवडून द्या.

टॅग्स :CM Eknath Shinde