
CM Eknath Shinde : डोंगरी विकाससाठी 200 कोटी रुपये देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दौलतनगर : डोंगरे विकासाच्या 200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दौलत नगर तालुका पाटण येथे केली. दौलतनगर येथे शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील संदीपान भुमरे उदय सामंत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अनिल बाबर शहाजी पाटील महेश शिंदे प्रकाश आबिटकर, रविराज देसाई आदित्य राज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुमच्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात आहे.
शासकीय योजनाचा लाभ मिळताना अनेक अडचणी येतात. या योजना सोप्या पद्धतीने विना अडथळा लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भावना ठेवून शासन आपल्या दारी ही संकल्पना मांडली. त्याचा प्रारंभ शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात होत आहे याचा अभिमान आहे.
दहा महिन्यापूर्वी सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन केले अडीच वर्षपूर्वी सर्व योजना सर्व प्रकल्प ठप्प होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सरकार महाराष्ट्रात स्थापन केले. तेथून विकासाला सुरुवात झाली.
मी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी शपथ घेतल्यावर पहिल्या कॅबिनेट पासून सर्व कॅबिनेट मध्ये सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणताही वैयक्तिक लाभाचा निर्णय घेतलेला नाही. भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहेल. तीनशे मोठे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेतले आहेत.
शेतकरी कष्टकरी कामगार महिला यांच्या विकासाचे निर्णय घेतले आहेत. आठ ते दहा महिन्यात 29 छोटे-मोठे मध्यम सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. शासन आपल्या दारी म्हणून एकाच छताखाली सर्व दाखले देण्याचा उपक्रम राज्यात हातात हाती घेतला आहे