थेट घोड्यावरूनच तरुणीची महाविद्यालयात एंट्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

कोल्हापूर: अपघातांचे वाढणारे प्रमाण...त्यातून उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे...वेगाने गाड्या चालविणारे विद्यार्थी...हे चित्र पाहिले, तर काळजात धस्स होतं. अठरा वर्षांखालील मुलांना पन्नास सीसी क्षमतेहून अधिक सीसीच्या गाड्या चालविण्यास देऊ नयेत, हा एक त्यासाठीचा चांगला पर्याय. त्याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी प्राजक्‍ता बागलने आज चक्क घोड्यावरूनच डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात एंट्री केली आणि अनेकांच्या भुवया आपसूकच उंचावल्या.

सोळा ते अठरा दरम्यानच्या मुला-मुलींना 50 सीसी क्षमतेखालील गाड्या चालविण्यास मनाई आहे. मात्र, सध्या या गाड्या वापरातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. साधारणपणे 70 सीसी क्षमतेच्या गाड्या बाजारात आहेत; पण तरीही जर 50 सीसी क्षमतेच्याच गाड्या मुले वापरत असतील, तरच त्यांना वाहन परवाना द्यावा, असा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करावे, या उद्देशाने अकरावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या प्राजक्ताने आज अनोखा उपक्रम राबवला. ती शाहू मिल कॉलनीतील घरातून घोड्यावर बसून महाविद्यालयात गेली. तिचे अशा येण्याने अनेकांच्या मनात प्रश्‍न उभे राहिले. विद्यार्थी-विद्यार्थ्यांना कुतूहलही वाटले.

त्या वेळी तिने नक्की हा उपक्रम कशासाठी केला, याचे उत्तर देताच अनेकांना तिचे कौतुकच वाटले.

Web Title: collage student entery in collage by the horse