कऱ्हाडला पाच तासांत सात ट्रॉली कचरा जमा

सचिन शिंदे
सोमवार, 14 मे 2018

कऱ्हाड (सातारा): शहरातील नव्या कोयना पुलावर पालिका कर्माचाऱ्यांनी आज सुामरे पाच तास स्वच्छता मोहिम राबवली. त्या मोहिमेत सात ट्रॉली कचरा जमा करण्यात आला. त्यामध्ये चार ट्रॉली कचरा केवळ प्लॅस्टीकचा होता. स्वच्छतेबरबोर त्या भागात आता पुढच्या टप्प्यात जागृतीसाठी प्रयत्न करणार आहे, असे आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव यांनी सांगितले.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येत आहे. नव्या कोयनापुल परिसरातही सकाळी स्वच्छता मोहिम झाली. त्यात हायवेवरून शहरातील मार्ग पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला. त्यामध्ये सात ट्रॉली कचरा जमा झाला. त्यामध्ये चार ट्रॉली कचरा केवळ प्लॅस्टीकचा जमा झाला. त्यात प्लॅस्टीकच्या बाटल्या, कागद, वेगळ्या आखराचे डबे, आईस्क्रीम खाऊन टाकलेला छोटे प्लॅस्टीकचे टीन, कॅरी बॅग अशा कचर्याचा समावेश होता. सकाळी सातला सुरू झालेली स्वच्छता मोहिम दुपारी बारापर्यंत सुरू राहिली. माती, ओला कचरा, अन्नाचे खरखाटे असा तीन ट्रॉली कचरा जमा झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीकचा कचरा जमो होण्यीची पहिलीच वेळ आहे. स्वच्छता अबियानेचे नियोजन आरोग्य सभापती सौ. यादव यांनी केले. प्लॅस्टीक कचरा कमी व्हावा, यासाठी या भागात विशेष जागृती मोहिम आरोग्य विभाग राबवण्रा आहे, असे यावेळी त्यांनी जाहीर केले.

यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, प्रितम यादव, पालिकेचे अधिकारी आर. डी भालदार, रोहित हातवडकर, देवानंद जगताप, श्री. नदाफ, मारूती काटरे, सुरंश शिंदे, अभिजीत खवळे यांच्यासह सुमारे वीस कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: To collect the garbage in Krhad within five hours