मतदार असाल तरच  कॉलेज प्रवेश, अन्यथा..! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

सांगली : बारावी शिक्षण झालेय... वय वर्षे अठरा पूर्ण आहे... तरीही, तुम्ही मतदार नाही, तर तुम्हाला पदवी किंवा तत्सम शिक्षणासाठी कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळणार नाही. त्याआधी मतदार नावनोंदणीसाठीचा 'सहा' नंबरचा अर्ज भरावा लागेल. या योजनेला गेल्यावर्षी सुरवात झाली आणि यंदाही अफलातून प्रतिसाद मिळतोय. मतदार नोंदणी प्रक्रियेचा मोठा फार येथेच हलका झाला आहे.

बारावीचे निकाल लागल्यानंतर महाविद्यालयांमध्ये विविध शाखांतील प्रवेशाची धामधूम सुरू झाली आहे. कला, वाणिज्य, विज्ञानसह व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत चालेल, असे सांगण्यात आले. येथे प्रवेश घेताना मतदान 'ओळखपत्र दाखवा', असे सांगितले जात आहे. ते असेल तर तुमची प्रवेश प्रक्रिया पुढे सुरू राहील. मतदार यादीत नाव नसेल तर मात्र तुम्हाला तेथेच उपलब्ध करण्यात आलेला मतदार नावनोंदणीचा सहा क्रमांकाचा अर्ज भरावा लागेल. 

त्यासोबत प्रवेशासाठी आणलेल्या कागदपत्रांपैकीच काही कागदपत्रे जोडावी लागतील. तो अर्ज दाखल केला की एकीकडे प्रवेशाची आणि दुसरीकडे मतदार नोंदणीचीही प्रक्रिया सुरू होईल. या योजनेमुळे नवे मतदार नावनोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.  गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची सुरवात करण्यात आली. यंदा त्याला 'सक्तीचे', असे स्वरूप देण्यात आल्याचा फायदा होत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

"गेल्यावर्षीपासून ही योजना प्रभावीपणे सुरू आहे. जोवर प्रवेश प्रक्रिया सुरू राहते तोवर प्रत्येक विद्यार्थी मतदार यादीत नाव नोंदवू शकतो. जे कॉलेज प्रवेश प्रक्रियेतून जात नाहीत त्यांच्यासाठी अन्य सोय आहेच.''  मीनाज मुल्ला, निवडणूक उपजिल्हाधिकारी 

Web Title: College admission only if there are voters