रंग-रेषांच्या दुनियेचा नवा धडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सांगली - शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य वातावरणात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देणारे कलाशिक्षक आज रंग-रेषांच्या दुनियेतील नवा धडा गिरवत होते. कॅन्व्हासवर मुक्तपणे रंगांची उधळण करत कलाविष्काराचे सादरीकरण झाले. त्यातील बारकावे, नवी स्टाइल प्रसिद्ध शिल्पकारांकडून समजून सांगण्यात आली. कुणी निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, तर कुणी कॅिलग्राफीतून नवा धडा गिरवत होता. याच उत्साहात राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित ३८ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचा समारोप झाला.

शांतिनिकेतनमध्ये झालेल्या या परिषदेसाठी राज्यभरातून पाचशेवर कलाशिक्षक उपस्थित होते. अधिवेशनाचा  आज दुसरा दिवस कला प्रात्यक्षिकांचा होता. संजय तडसरकर (कोल्हापूर), सुरेंद्र जगताप (मुंबई),  सत्यजित वरेकर (सांगली), अनिल अभंगे (नाशिक), रमण लोहार (गडहिंग्लज), बाळ हेळेकर (कोल्हापूर), श्रीरंग मोरे (इचलकरंजी), हणमंत लोहार (पाटण) यांनी निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र याविषयी प्रात्यक्षिकांसह नवा धडा दिला. सांगलीचे प्रमोद खंजिरे आणि अमोल टकले यांनी वीस फुटी कागदावरील कॅलीग्राफीचे प्रात्यक्षिक दाखवले. आर्किटेक्‍ट प्रमोद चौगुले, प्रा. एम. एस. राजपूत, प्रा. सुरेश पंडित यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. राहुल संबोधी यांचे बाहुली नाट्य आणि कठपुतली प्रयोगाचेही सादरीकरण झाले. त्यानंतर दुपारी राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप, प्राचार्य बाळासाहेब पाटील यांचे खुले चर्चा सत्र झाले. सायंकाळी चित्रकला व शिल्प संचालनालयाचे निरीक्षक भास्कर तिखे यांच्या उपस्थितीत  परिषदेचा समारोप  झाला. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कलाध्यापक संघाचे राज्याध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष दादा भगाटे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी, उपाध्यक्ष राजेंद्र ठोके, सचिव धनंजय इंगळे, खजिनदार प्रकार गुदले, वंदना हुळबत्ते यांनी संयोजन केले.  

हस्तलिखीत पुस्तकाचे आकर्षण... 
परिषदेत सांगलीचे संतोष पाटील यांचे हस्तलिखीत पुस्तकाचे वेगळे आकर्षण होते. राज्यात प्रथमच हस्तलिखीत पुस्तकाचा प्रयोग करण्यात आला आहे. परिपूर्ण चित्रकला नावाने असणाऱ्या पुस्तकात  कलेविषयी इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. 

प्रलंबित मागण्या काय?
प्रत्यक्ष शाळेत कलाशिक्षक गरजेचा 
दहावीत चित्रकला विषयाचा पेपर आवश्‍यक 
संच मान्यतेत कलाशिक्षकांना घ्यावे 
कलाशिक्षकांना अतिरिक्त करू नये

Web Title: color-line world