Maratha Reservation : राज्य शासन टक्केवारी वाढवू शकते - शाहू महाराज

Maratha Reservation : राज्य शासन टक्केवारी वाढवू शकते - शाहू महाराज

कोल्हापूर - उच्च न्यायालयाने बारा ते तेरा टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय दिला असला तरी राज्य शासनाला ही टक्केवारी वाढवण्यात अडचण नाही. तशी मुभा शासनाला दिली असल्याचे समजते. शासन जास्तीत जास्त टक्केवारीपर्यंत हे आरक्षण वाढवू शकते. गेल्या तीन-चार वर्षात जी आंदोलने झाली त्या आंदोलनाचाही उपयोग आरक्षण मिळवण्यासाठी झाला, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली. 

उच्च न्यायालयाने मराठा समाजास 16 टक्क्यांऐवजी 12 ते 13 टक्के आरक्षण देणारा निर्णय दिला आहे. यावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या निर्णयावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया - 

राजकारण न करता स्वागत हवे - यशवंतराव थोरात

शैक्षणिक, नोकरीच्या क्षेत्रात अजून पुढे जाता येत नाही, त्या मराठा बांधवांना या आरक्षणाचा फायदा प्राधान्याने मिळाला पाहिजे. आजच्या निर्णयाचे सर्व पक्ष, सर्व संघटनांनी कोणतेही राजकारण न करता स्वागत केले पाहिजे. या निर्णयापर्यंत यायला मोठा संघर्षमय प्रवास करावा लागला आहे. विशेषतः मध्यमवर्गीय सर्वसामान्य मराठा बांधवांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या. राजकीय व प्रशासकीय घटकांनी कायदेशीर बाजू भक्कम होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि न्यायालयाने वास्तव पाहून न्याय दिला. त्यामुळे हे तिन्ही घटक अभिनंदनास पात्र आहेत. 
- यशवंतराव थोरात,
"नाबार्ड'चे माजी अध्यक्ष 

प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचे समाधान - डाॅ. पवार

न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठा समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रदीर्घ असा प्रभाव यामुळे पडणार आहे. विविध टप्प्यावर झालेल्या आंदोलनात माझाही सहभाग होता. मागासवर्गीय आयोगाला जे काही दस्ताऐवज हवे होते ते मी दिले. त्यात माझा खारीचा वाटा असल्याचा निश्‍चित आनंद होतो. अनेक लोकांनी या कामी मदत केली. प्रदीर्घ काळ प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचे समाधान आहे. मराठा समाजाने या निर्णयाचा भरभरून फायदा घ्यावा. 
- डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com