पाचशे, हजाराच्या नोटा द्या अन्‌ चेक घेऊन जावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून अचानक बंद झाल्यामुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. त्याचा फायदा घेऊन काही जणांनी कमिशनवर पाचशे, हजाराच्या नोटा बदलून देण्याचा काही व्यापारपेठांमध्ये सुरू केलेला धंदा आज शहरात चर्चेचा विषय बनला होता. मात्र हा व्यवसाय घाऊक म्हणजे लाखाच्या वरच्या रकमेचा होता. 

चलनातील पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केला. ही निर्णय जाहीर करत असताना संबंधितांना संधी मिळणार नाही याचीही खबरदारी घेतली आहे. बॅंका बंद झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आणि निर्णय जाहीर केल्यानंतर बॅंकाना सुटी जाहीर केली. दोन दिवस एटीएम बंद ठेवण्यात आले. त्यामुळे विशेषत: व्यापार, व्यावसायिकांची अडचण झाली आहे. आजही फाटक्‍या, जीर्ण झालेल्या नोटा काही ठिकाणी घेतल्या जातात. येथे फाटक्‍या नोटा बदलून मिळतील, असे फलक अनेक ठिकाणी पहायवास मिळतात. येथे फाटक्‍या नोटा घेतल्या जातात व त्यातील ठराविक रक्कम कापून घेऊन उर्वरित रक्‍कम संबंधितांना दिली जाते. यात ज्याची नोट असते त्याला आपली नोट चालल्याचे समाधान मिळते आणि घेणाऱ्याला कमिशन मिळते. त्यामुळे दोघेही खूश असतात. सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाने लोकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेचा फायदा घेऊन शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या तसेच शहराच्या पूर्वेला असणाऱ्या बाजारपेठांमध्ये पाचशे व हजारांच्या नोटा याच पद्धतीने घेण्यास सुरवात केली. यामध्ये मात्र नोटेला नोट नाही तर पाचशे, हजाराच्या नोटा द्यायच्या आणि चेक घेऊन जायचा असा व्यवहार सुरू असल्याचे समजते. 

Web Title: On commission to change the five hundred