सामान्यांना परवडणारी वैद्यकीय सेवा गरजेची - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

औंध - ‘‘उपचार पद्धतीत होत असणारे सातत्यपूर्ण बदल, नवनवीन विदेशी तंत्रज्ञान यामुळे वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत असून, ती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. अशा वेळी आपल्याच देशात संशोधन करून वैद्यकीय सेवा सामान्यांना परवडेल, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्रयत्न करावेत,’’ अशी अपेक्षा ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली. सर्व डॉक्‍टर एकत्र येऊन संशोधन आणि प्रशिक्षणाचा करीत असलेला उपक्रम स्तुत्य आणि सर्व घटकांसाठी अनुकरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनतर्फे आरोग्यविषयक नियतकालिकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठी, बाणेर बालेवाडी मेडिकोजचे अध्यक्ष डॉ. जे. एस. महाजन, उपाध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, डॉ. निरज आडकर, डॉ. प्रिया देशपांडे इत्यादी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘की उत्पन्नाचा स्रोत याशिवाय वैद्यकीय सेवेला एक सामाजिक सेवा म्हणूनही महत्त्व आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडताना सामाजिक भानसुद्धा ठेवणे गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येक भूभागानुसार वेगवेगळे वातावरण असून, त्याचाही परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे उपचारपद्धतीही वेगवेगळ्या आहेत. तरीपण आपण समाजाचा एक घटक म्हणून समाजाला काही तरी देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. परवडणाऱ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तुम्ही सर्व जण हे करू शकता.’’ या वेळी डॉ. सेठी यांनीही मार्गदर्शन केले. 

सूत्रसंचालन डॉ. कविता चौधरी यांनी केले. आभार डॉ. राजेश देशपांडे यांनी मानले.

Web Title: The common need affordable medical services