टेक्नोसॅव्ही मंत्री जयंत पाटलांची 'मराठी स्पेस' ठरली नेटीझन्संना मेजवानी

‘मराठी स्पेस' या व्यासपीठावर त्यांनी ८७० लोकांशी साधला संवाद
टेक्नोसॅव्ही मंत्री जयंत पाटलांची 'मराठी स्पेस' ठरली नेटीझन्संना मेजवानी

सांगली : राज्याच्या मंत्रिमंडळात 'टेक्नोसॅव्ही मंत्री' म्हणून ज्यांना ओळखले जाते (technosavy mantri) असे राज्यातील ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी रविवारच्या रात्री ट्विटरच्या माध्यमातून "मराठी स्पेस" (marathi space) या व्यासपीठावर साधलेला संवाद ही नेटीझन्संना (netizens) मेजवानी ठरली. या संवादात जवळपास ८७० लोकांनी सहभाग घेतला होता.

ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील हे नेहमीच समाजमाध्यमांवर (social media) उपलब्ध होणाऱ्या नवनवीन व्यासपीठांचा वापर चांगल्या खुबीने करीत असतात. या व्यासपीठांवर ते नेटीझन्सनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी मुक्तपणे संवादही साधत असतात. जयंत पाटील यांची राजकारणाच्या पटलावर अत्यंत अभ्यासू संयमी वक्ता म्हणून ओळख आहे. जयंतरावांची अनेक राजकीय भाषणे गाजलेली आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षातील आमदारदेखील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात इतक्या प्रभावीपणे व मुद्देसूद जनतेच्या प्रश्नांची मांडणी ते करतात.

टेक्नोसॅव्ही मंत्री जयंत पाटलांची 'मराठी स्पेस' ठरली नेटीझन्संना मेजवानी
महापूर व्यवस्थापनावर जलसंपदामंत्र्यांच्या बैठकीत केवळ चर्चाच

रविवारच्या रात्री त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून "मराठी स्पेस" या व्यासपीठावर साधलेला संवाद ही नेटीझन्संना मेजवानीच ठरली. या संवादात जवळपास ८७० लोकांनी सहभाग घेतला होता. जयंत पाटील यांनी या सर्वांशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी सहभागी झालेल्या लोकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या. नेटीझन्सनीदेखील राजकीय, सामाजिक आणि कोरोनाविषयक प्रश्न उपस्थित केले त्याला तितक्याच समर्पकपणे मंत्री पाटील यांनी उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com