जागतिक स्तरावरील विपरीत परिणामावर अग्निहोत्राद्वारे मात

शिवपुरी येथील सामूहिक अग्निहोत्र
शिवपुरी येथील सामूहिक अग्निहोत्र

सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली. 

या संदर्भात युक्रेनमधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या किव्ह युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या संस्थेने संशोधन केल्याचे त्यांना कळविले आहे.

जर्मनीच्या अग्निहोत्र प्रचारक डॉ. उलरिक बर्क यांनी जगातील नामवंत विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञांबरोबर अग्निहोत्रविषयक अनेक संशोधन केलेले आहेत. त्या प्रयोगातूनही अग्निहोत्राचे भस्म किरणोत्सर्गच्या हानिकारक परिणामापासून वाचवू शकेल, असे संशोधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेनच्या डॉ. क्रासनोहोलोवेट्‌स यांनी तेथील एका संस्थेमध्ये फुकुशिमाच्या किरणोत्सर्गबाधित तांदळावर रासायनिक प्रयोग केले. त्यामध्ये असे अग्निहोत्र भस्म संस्कारित तांदळात १५ दिवसांत ‘रेडिएशन’ २०० बिक्‍यू-केजीवरून ३ बिक्‍यू-केजी (रेडिएशन मोजण्याचे मापदंड) इतके कमी झाले.

म्हणजे तो बाधित तांदूळ संपूर्णपणे सुरक्षित सिद्ध झाल्याचे संशोधन अहवालात नमूद करण्यात आल्याचे डॉ. राजीमवाले यांनी सांगितले. हा प्राथमिक प्रयोग असून, अधिक अभ्यास करण्याची तयारी केली जात आहे. तसेच, विषारी किरणोत्सर्गबाधित भाजीपाला, चारा व अन्नधान्य भस्माच्या प्रक्रियेने शुद्ध करता आले, असे या अहवालात नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवपुरी येथील संस्थानच्या वतीने ७० वर्षांपासून होम व अग्निहोत्राचे महत्त्व व कार्याबाबतचे माहिती देण्यात येत आहे. ६० देशांतील अनुयायांनी याचा लाभ घेतला आहे. शिवपुरी संस्थान म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या शिष्य परंपरेतील बाळप्पा महाराजांचा वारसा आहे.  

विज्ञानासमोर आव्हान 
अग्निहोत्र हा कोणताही धार्मिक अथवा अंधश्रद्धा पसरविण्याचा विधी नसून, प्रत्यक्ष शास्त्रीय संशोधनातून प्रयोगाद्वारे प्रमाणीत केलेला समाजोपयोगीच निष्कर्ष आहे. याचा लाभ जनमानसास होत असून, दूषित अन्न, हवा, पाणी, पर्यावरण, दूध, कृषी उत्पादन, मानवी आरोग्य, जैविक, रासायनिक प्रदूषणावर मात होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

वातावरणातील फरकामुळे अनेक जागतिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर अग्निहोत्र हाच उत्तम उपाय आहे. जागतिक पातळीवरील पर्यावरणाच्या अनेक समस्यांवर अग्निहोत्र हा उपाय असल्याचे शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे.
- डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले, संचालक, विश्‍व फाउंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com