सोमेश्वरनगर : विषारी वायूगळतीने घेतला कंपनी अधिकाऱ्याचा बळी

The company officer has died due to poisonous gas at Someshvarnagar
The company officer has died due to poisonous gas at Someshvarnagar

सोमेश्वरनगर - नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या केमीकल उत्पादक कंपनीतून झालेल्या विषारी वायूगळतीने अखेर आज कंपनीच्याच एका अधिकाऱ्याचा बळी घेतला. संजय जगन्नाथ ढवळे (वय 45 रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. यामुळे कामगारांमध्ये आणि कंपनीशेजारील परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

ज्युबिलंट कंपनीमध्ये 17 एप्रिलला दुपारी अॅसेटीक अनहायड्राईड या विषारी वायूचे उत्पादन करणाऱ्या प्लँटवरील टँकमधून जास्त दाब तयार झाल्याने वायूगळती झाली होती. यानंतर काही क्षणातच वायू परिसरात पसरून सुमारे पन्नास कामगार-अधिकाऱ्यांना डोळ्यांचा, श्वसनाचा आणि पोटाचा त्रास जाणवू लागला होता. या पन्नास लोकांना जवळच्याच खासगी रूग्णालयांमध्ये उपाचारार्थ दाखल केले. यामधील सात ते आठ जणांना अत्यवस्थ झाल्याने के. ई. एम. या रूग्णालयात हलविण्यात आले होते. यापैकी संजय ढवळे आणि दत्तात्रेय गायकवाड यांच्यावर अजूनही उपचार सुरू होते. काल रात्री उशिरा ढवळे यांचे निधन झाले. आज सदरची बातमी परिसरात पसरताच पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. ढवळे हे एक्झीक्युटीव्ह अधिकारी असून ट्रान्स्पोर्टच्या वाहनांची तपासणीचे काम करत होते. वायूगळतीच्या प्लँटपासून जवळच काम करत असल्याने त्यांना जास्त बाधा झाली होती. सुरवातीला लोणंद येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती बिघडल्याने पुणे येथे हलविले होते. दीघ उपचारानंतरही त्यांच्यावर मृत्यू ओढवला. त्यांच्या रूपाने वायूगळतीचा पहिला बळी गेला असून आणखी एकजण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी लक्ष घातले होते. आता सदर घटनेने या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली असून विषारी वायू उत्पादनावर बंदी आणण्याची मागणी होत आहे.  

गुन्हा दाखल करण्याची मागणी -
ढवळे यांचा मृत्यू कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. यामुळे कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नीरा नदी बचाव समितीचे अॅड. धर्मराज यादव, वैभव कोंडे, सचिन मोरे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com