गतवर्षीच्या तुलने कोयनेत 11 टिएमसी अधिक पाणीसाठी 

जालिंदर सत्रे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पाटण (जि. सातारा)  : कोयना भागात 23 जुनपासुन पडत असलेल्या पावसामध्ये काही दिवसांचा अपवाद सोडला तर सातत्य असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. पाणीपातळी 2158.06 फुट व एकुण पाणीसाठा 98.78 टीएमसी असुन गतवर्षीच्या तुलनेत 11 टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. धरण परिचलन सुचिनुसार पाणीसाठा नियंत्रणासाठी सांडव्यावरुन दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेली 50 दिवस सातत्याने मुसळधार, संततधार तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने कोयना व नवजाला चार हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने आोलांडला आहे.

पाटण (जि. सातारा)  : कोयना भागात 23 जुनपासुन पडत असलेल्या पावसामध्ये काही दिवसांचा अपवाद सोडला तर सातत्य असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. पाणीपातळी 2158.06 फुट व एकुण पाणीसाठा 98.78 टीएमसी असुन गतवर्षीच्या तुलनेत 11 टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. धरण परिचलन सुचिनुसार पाणीसाठा नियंत्रणासाठी सांडव्यावरुन दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेली 50 दिवस सातत्याने मुसळधार, संततधार तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने कोयना व नवजाला चार हजार मिलीमीटरचा टप्पा पावसाने आोलांडला आहे. आजपर्यंत कोयनानगरला 4081 मिलीमीटर, नवजाला 4146 मिलीमीटर व महाबळेश्र्वरला 3613 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असुन गतवर्षीच्या तुलनेत ती अनुक्रमे 611 मिलीमीटर,198 मिलीमीटर व 254 मिलीमीटरने जास्त आहे.

गतवर्षीच्या तुलनेत 6.40 टीएमसी पाणीसाठा जास्त असुन पुरनियंत्रणासाठी पायथा वीजगृह व सांडव्यावरुन 14.19 टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडुन दिले आहे. जलाशयाचा एकुण पाणीसाठा 83.95 टीएमसी असुन धरणात जलवर्षात 75.30 टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. 

पाणीसाठा 77.92 टीएमसी झाल्यानंतर धरणव्यवस्थापणाणे पाणीसाठा नियंत्रणासाठी 17 जुलैला पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाजे  उचलुन सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. नऊ दिवस सांडव्यावरुन व 23 दिवस पायथा वीजगृहातुन पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयनानदी पात्रात विसर्ग करण्यात आलेला आहे. पाच जुलैला पुन्हा पायथा वीजगृहातुन विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. आज पासुन पुन्हा सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरुन कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.

1 जुन पासुन धरणात 93.99 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी 17 जुलैपासुन पायथा वीजगृहातुन 3.93 टीएमसी व सहा वक्र दरवाजांच्या सांडव्यावरुन 12.66 टीएमसी असा 16.59 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात आलेला आहे. जल वर्ष 1 जुनला सुरु झाले तेव्हापासून आजपर्यंत पश्चिमेकडे वीजनिर्मीतीसाठी 10.16 टीएमसी व पुर्वेकडे 1.73 टीएमसी पाण्याचा वापर पायथा वीजगृहातुन वीजनिर्मीतीकरुन सिंचनासाठी करण्यात आलेला आहे. 

गतवर्षी जलाशयाचा पाणीसाठा 87.75 टीएमसी व पाणीपातळी 2149.10 फुट होती. आज पाणीसाठा 98.78 टीएमसी व पाणीपातळी 2158.06 फुट आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा नियंत्रणासाठी 16.59 टीएमसी पाणी सोडुनही पाणीपातळी 8.8 फुट व पाणीसाठा 11.03 टीएमसीने जास्त आहे.

Web Title: Compared to last year, 11 TMC more water in Koyna dam