मोहोळ - राष्ट्रवादी, भाजपच्या विकास कामांच्या स्पर्धेत जनतेचा फायदा

राजकुमार शहा 
बुधवार, 6 जून 2018

मोहोळ : राजकारणात कोण कुणाशी कशासाठी स्पर्धा करेल हे सांगता येत नाही मात्र मोहोळ तालुक्यात भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे व राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष रमेश बारसकर या दोघात विकास कामांची स्पर्धा लागली आहे. दोघेही आपले राजकीय अस्तीत्व राखण्यासाठी धडपडताना दिसत आहेत मात्र दोघांच्या या स्पर्धेचा फायदा जनतेला होत आहे.

मोहोळ : राजकारणात कोण कुणाशी कशासाठी स्पर्धा करेल हे सांगता येत नाही मात्र मोहोळ तालुक्यात भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे व राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष रमेश बारसकर या दोघात विकास कामांची स्पर्धा लागली आहे. दोघेही आपले राजकीय अस्तीत्व राखण्यासाठी धडपडताना दिसत आहेत मात्र दोघांच्या या स्पर्धेचा फायदा जनतेला होत आहे.

रमेश बारसकर हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही माहिन्यापुर्वी बारसकर यांनी शहराजवळील ओढ्याचे लोकसहभाग व स्वखर्चाने सरळीकरण केले आहे. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. त्यावर आता बंधारा बांधण्याचे काम बारसकर हाती घेणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी किमान पंधरा कोटी पाणी साठा होणार आहे. शहराच्या विकासासाठी त्यांना खा. शरद पवार व खा वाजीद मेमन यांच्या माध्यमातुन एक कोटीचा विकास निधी खेचुन आणला आहे. शहरात कचरा टाकण्यासाठी त्यांनी मुंबईच्या धर्तीवर लेटरबीन बसवीण्याचे काम सुरू केले आहे बारसकर हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या थेट संपर्कात आहेत. 

यापुर्वी तालुक्यात भाजपाला नगण्य स्थान होते मात्र सतीश काळे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यापासुन जनतेला विविध कामांच्या माध्यमातुन अच्छे दिन यायला सुरवात झाली आहे. काळे यांनी भाजपाच्या विविध मंत्र्याच्या माध्यमातुन विकास कामांचा सपाटा लावला आहे. सध्या काळे यांनी सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या ओढ्याचे लोकसहभाग व स्वखर्चाने सरळीकरण व खोलीकरण सुरू केल आहे. त्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या माध्यमातुन पावसाळ्यात सुमारे चौदा कोटी लीटर पाणी साठा होणार आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करून काळे यांनी शहरापासुन पाच कि मी अंतरावरील घाटणे बॅरेज बंधारा अडवुन नऊ गावांच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला. काळे हे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात आहेत. आता आष्टी तालावातुन पोखरापुर  तलावात पाणी सोडण्याचे महत्व पुर्ण काम काळे यांनी हाती घेतले आहे. या दोघांच्या स्पर्धत मात्र जनतेची सोय होणार आहे.

Web Title: competition between bjp and rashtravadi profits to citizens of mohol