शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सोलापूर - राज्यातील शिक्षकांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचा वापर अध्ययन-अध्यापनात करणे गरजेचे आहे. राज्यातील अशा वेगळेपण असलेल्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी शिक्षकांनी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे मार्फत यंदाच्या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा Online पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. MSCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पाच गटांत आयोजित करण्यात येत आहे. शिक्षकांना त्यांचे नवोपक्रम http://maa.ac.in/innovation२०१८-१९  येथे सादर करता येतील.

स्पर्धेचे गट
    पूर्वप्राथमिक अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 
    प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
    माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
    विषय सहायक व विषय साधन व्यक्ती
    अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी)

Web Title: Competition for Teacher