आप्पासाहेब समींदर यांच्याविरुद्ध निवेदनाद्वारे तक्रार

हुकूम मुलाणी
बुधवार, 13 जून 2018

मंगळवेढा - भीमा नदीच्या पात्रातून ओव्हरलोड वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एंट्री न दिल्यामुळे केलेल्या कारवाईत आप्पासाहेब समींदर यांना दंड आकरण्यात आला होता. हा दंड भरताना हिशोबात अढलेल्या विसंगतीमुळे मंगळवेढयाचे तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील कागष्ट येथील विजय भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. 

वाळू उपशातील कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे यापूर्वीच्या तहसिलदारावर निलबंनाची कारवाई करण्यात आली असताना भोसले यांच्या तक्रारीमुळे मंगळवेढ्याचे तहसिलदार पुन्हा चर्चेत आले.

या निवेदनात भोसले यांनी म्हटले आहे की, अर्धनारी ता मोहोळ येथून वाळू भरुन आणलेल्या टिपरची (क्र. एम.एच.08के.4079) ब्रम्हपुरी येथे तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रास वाळू जास्त आढळल्यामुळे त्यावर 76750 इतक्या दंडाची आकारणी करुन भरण्याबाबत नोटीसही दिली. याच कारवाई दरम्यान ओव्हरलोड वाळू आढळलेल्या अन्य दोन टिपरवर 25250 इतका दंड आकारला गेला. दंडाच्या रकमेतील फरकाबाबत विचारले असता तहसीलदार यांनी कार्यालयात जावून विचारले असता बाहेर जाण्यास सांगीतले. एंट्री देणाऱ्या टिपरचालकाला कमी दंड अन्य टिपरला जादा दंड आकारला. 

तहसीलदारच्या मनमानी कारभारामुळे अन्य वाहनधारकाला त्रास होत असून, याच्या चौकशीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

केलेली कारवाई योग्य पध्दतीने केली असून, तक्रार तथ्यहीन आहे. मी कोणत्याही चौकशी तयार आहे. 
- आप्पासाहेब समींदर तहसीलदार

Web Title: Complaint against Appasaheb Samindar