महेश नागरी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सातारा - तब्बल तीन कोटी रुपयांचा अपहार करून तो संघटीतपणे दडपण्याचा प्रयत्न करून सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महेश नागरी पतसंस्थेचे संचालक व सनदी लेखा परिक्षक अशा 13 जणांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सातारा - तब्बल तीन कोटी रुपयांचा अपहार करून तो संघटीतपणे दडपण्याचा प्रयत्न करून सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महेश नागरी पतसंस्थेचे संचालक व सनदी लेखा परिक्षक अशा 13 जणांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपाध्यक्ष मुकुंद संपतराव सारडा (वय 60, रा. भवानी पेठ), सुभाष शिवलाल लोया (वय 60, रा. लोखंडे कॉलनी), शिरीष शांतराम पालकर (वय 53, रा. भवानी पेठ), सुनिल चोथमल राठी (वय 62, रा. सोमवार पेठ), राहुल झेकरमल गुगळे (वय 51, रा. प्रतापगंज पेठ), रविंद्र रामविलास जाजू (वय 61, रा. शनिवार पेठ), निलेश द्वारकानाथ लाहोटी (वय 45, रा. प्रतापगंज पेठ), धिरज राजेंद्र कासट (वय 33, रा. भवानी पेठ), सुरेश व्यंकटलाल सारडा (वय 55, रा. भवानी पेठ), सुरेश बाळकृष्ण भस्मे (वय 65, रा. सोमवार पेठ), राजश्री राधाकिसन लाहोटी (वय 55, रा. भवानी पेठ), पदमा जगदीश कासट (वय 25, रा. भवानी पेठ) व सनदी लेखापाल हेमंत अनंत कुलकर्णी (रा. शनिवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

शासकीय लेखा परिक्षक राणी शिवाजी घायताडे (रा. सुभाषनगर, कोरेगाव) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. 2010 ते 2016 या कालावधीत वरील संशयीतांनी महेश नागरी पतसंस्थेमध्ये सुमारे तीन कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केला. या रक्कमेच्या वसुलीबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. त्यात हगर्जीपणा व निष्काळजीपणा करून बेजबाबदार कृत्य केले. त्याचबरोबर आपसात हिंतसंबंध प्रस्तापित करून अपहरण दडपण्याच्या उद्देशाने संगनमताने सभासद, ठेवीदार, सहकार विभाग व शासनाची फसवणूक केली. तसेच ठेवीदारांचे आर्थीक नुकसान केले असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक नसिमखान फरास तपास करत आहेत

Web Title: complaint against the director of the Mahesh Nagari Credit Society