शारीरिक व मानसिक छळ पोलीस उपनिरीक्षावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पाथर्डी : येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व त्यांच्या कुटुंबीयाने आपला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. पावसे व त्याचा मित्र वैजीनाथ पवार यांनी आपल्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आपल्या लहान मुलीशी अनैसर्गिक प्रकार केल्याचा गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तीनच दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी पावसे यांना निलंबित केले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी असलेली महिला उपनिरीक्षक पावसे यांची दुसरी पत्नी आहे. दरम्यान याच प्रकरणात दुसरा आरोपी असलेल्या वैजीनाथ पवार याच्या पत्नीने पावसे याची पत्नी व तिच्या कुटुंबातील सदस्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आज सायंकाळपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. याबाबद दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी पुंडलिक पावसे यांच्याशी विवाह केल्यानंतर पाथर्डी येथे राहत होते. त्यांनी वेळोवेळी आपल्या कडून पैसे घेतले. माझ्या नावावर असलेली चारचाकी गाडी त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी पुंडलिक पावसे, गुणाबाई पावसे, धोंडीराम पावसे (सर्व रा. निफाड जि. नाशिक) यांचा पाथर्डी येथील मित्र वैजिनाथ पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड ने मारहाण करत अंगावरील सोने काढून घेतले.

तसेच पावसे व पवार यांनी आपल्या लहान मुलीशी अनैसर्गिक प्रकार केल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे व बालकांचे लैंगीक शोषण प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान याच प्रकरणी एका महीलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आपण आपल्या घरी असताना भारत गायकवाड, मीनाबाई उर्फ बायजाबाई अमृत बिलाडे तसेच फिर्यादीचे मामा व त्याचा मुलगा (सर्व रा. सुलखेड जी. धुळे) हे आपल्या घरी आले व घराच्या बाहेर असलेल्या आपल्या मुलीचा भारत गायकवाड याने विनयभंग केला. तर इतर आरोपींनी आपणास तलवारीने मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे करत आहे. पावसे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक अभीजित शिवथरे करत आहेत. दरम्यान याच मुद्यावरून रंजनकुमार शर्मा यांनी पावसे यांना तीन दिवसांपूर्वी निलंबित केले होते.

Web Title: complaint against police officer of physical and mental torture