पोलिसाची पत्नी म्हणतेय मला वाचवा! कारण...

पोलिसाची पत्नी म्हणतेय मला वाचवा! कारण...

सोलापूर : मंगळवेढा पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलिस नाईक तानाजी इंगोले यांनी पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी पत्नी दीपाली इंगोले यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे. पतीपासून स्वत:ला आणि कुटुंबाला धोका असून योग्य न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा : मोबाईल ऍप बनविण्यासाठी किती खर्च येतो? वाचा..  

शारीरिक व मानसिक छळ
पोलिस नाईक तानाजी इंगोले आणि दीपाली यांचे लग्न 28 मे 2011 रोजी झाले. त्यांना एक मुलगी, एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पोलिस कर्मचारी तानाजी इंगोले हे दारूच्या आहारी जाऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत आहेत. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत आहेत. 6 डिसेंबर रोजी मारहाण केल्यानंतर पत्नी दीपाली यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्‍चर झाले आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : Solapur : नवी पेठेत सोमवारपासून वाहनांना बंदी! कारण​

पतीवर कारवाई करावी
पतीच्या मारहाणीला सासू, सासरा, दीर आणि जाऊ हे मदत करतात असे दीपाली इंगोले यांनी आपल्या निवेनात म्हटले आहे. आपल्या अर्जाचा सहानुभूतिपूर्वक विचार करून पती तानाजी इंगोले यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यापासून कुटुंबाच्या जीवितास धोका आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. दीपाली यांनी आपल्या निवेदनासोबत पोलिस नाईक तानाजी इंगोले यांच्यावर दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहितीही जोडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com