नगरसेवकांची सर्वसाधारण सभा न घेतल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - नगरपरिषदेच्या विकास कामसाठीची दरमहा नगरसेवकांची सर्वसाधारण सभा न घेतल्याबाबत  नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर जिल्हाअधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कलम 81(3)अन्वये आदेश करून जिल्हा प्रशासन अधिकारी, डॉ.पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची सभा घेणेबाबत आदेश दिले. अशी माहिती अजित जगतात यांनी दिली.

याबाबत नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनसुध्दा वेळेवर सभा घेतल्या नाही. विकासासाठी आलेला निधी परत जाण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकासकामाचे विषय देऊन नगराध्यक्षाकडे विनंती अर्ज दिला. परंतु, हक्क, अधिकार, श्रेयवादाचे राजकारणातून नगरपरिषदेची सभा घेतली जात नसल्याचा आरोप नगरसेवकातुन होवू लागला. प्रयत्न करून आणलेला निधी परत जाऊ नये म्हणून सर्वपक्षीय नगरसेकांनी जिल्हाअधिकारी यांना विनंती अर्ज केला होता.

नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनुसार विशेष सभा घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेत स्थगिती देण्याची मागणी नगराध्यक्षा अरुण माळी यांनी केली.

पक्ष नेते व नगराध्यक्षांमध्ये खडाजंगी ...
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य नसताना अनधिकृत प्रवेश केल्यावरून पक्षनेते अजित जगताप व नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून तक्रार दाखल करण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. परंतु, आमदार भारत भालके, पार्टीचे नेते राहुल शहा यांच्या मध्यस्थी नंतर या वादावर पडदा पडला. शहराच्या विकास कामाबद्दल विचार करता हे वाद शहर विकासासाठी हानिकारक आहेत.

Web Title: Complaint to District Collector for not taking general meeting of corporators