नेलकरंजी-खरसुंडी पूल वाहून गेल्याने पूर्ण वाहतूक बंद

Complete closure of Nelkaranji-Kharsundi bridge
Complete closure of Nelkaranji-Kharsundi bridge

खरसुंडी : नेलकरंजी खरसुंडी मार्गावरील पूल पावसामुळे वाहून गेल्याने पूर्ण वाहतूक बंद पडली आहे. या मार्गावरील सर्वच गावांचा संपर्क तुटला असून पूल तात्काळ दुरुस्त करून वाहतूक सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. खरसुंडी-नेलकरंजी मार्गा वरून 25 हून अधिक गावांना या मार्गाने वाहतूक चालते. 

अति पावसामुळे हा पूल गत आठवड्यात वाहून गेला. पूल वाहून गेल्यापासून या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे.नुसती वाहतूकच नव्हे तर नागरिकांनाही जाता येत नाही.अशी स्थिती आठवड्यापासून सुरू आहे.सांगली व आठपाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली.

अधिकाऱ्यांनी तात्काळ पर्यायी दुरुस्तीही करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या दिवशी दुरुस्ती करण्यात आली त्याच दिवशी रात्री पाऊस झाल्यामुळे पूल परत वाहून गेला.यामुळे सध्या या मार्गावरील वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. या मार्गावरील वाहतुकीचा विचार करून बांधकाम खात्याने पर्यायी तात्पुरता मार्ग सुरू करण्याची ची गरज आहे. या मार्गावरील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खरसुंडी करगणी मार्गे भिवघाटला जावे लागत आहे. हे अंतर तेवीस किमीचे आहे. सात किमी अंतर नेलकरंजी चे असताना पुलामुळे वाहतुकीची व नागरिकाची झाली आहे.सध्या दोन दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली असल्याने पर्यायी तात्पुरता पूल सुरू करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com