अक्कलकोट येथे आत्मविश्वास अभियान कार्यशाळा संपन्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

अक्कलकोट - अक्कलकोट येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यातील सर्व घटकांना एकत्रित केले स्वच्छ भारत मिशन मार्गदर्शन आत्मविश्वास अभियान कार्यशाळा संपन्न झाली.

अक्कलकोट - अक्कलकोट येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुक्यातील सर्व घटकांना एकत्रित केले स्वच्छ भारत मिशन मार्गदर्शन आत्मविश्वास अभियान कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी दीपस्तंभ फाउंडेशन जळगावचे यजुर्वेन्द्र महाजन यांचे मौलिक विचार ऐकावयास मिळाले. आज कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उप मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील लोंढे, जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे,मल्लिकार्जुन काटगाव, उपसभापती प्रकाश हिप्परगी,गटविकास अधिकारी प्रवीण शिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांच्यासह सर्व गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप्रज्वलनाने कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आल्यानंतर डॉ.भारुड यांनी या कार्यशाळेमागची भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक गाव, शाळा आणि परिसर स्वच्छ राहण्यासाठी पर्यावरण आणि आरोग्य या दोन समस्यांचा आपल्याला सामना करावयाचा आहे. त्यासाठी सर्वांनी व्यापक भूमिका घेण्याचे आवाहन आपल्या प्रस्ताविकेत केले. जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या कार्यक्रमात बोलताना यजुर्वेन्द्र म्हणाले की सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक व थर्माकोल निर्मूलन या ठळक बाबींवर काम कसे करायचे आणि त्याचे समूळ उच्चाटन कसे करायचे याचा सखोल परामर्ष त्यांनी केला. या सर्व बाबींसाठी प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या उघड्या गटारी नष्ट करायला हवेत. शासकीय व निमशासकीय कर्मचारी जे कोणी कोणत्या हुद्द्यावर आहेत तो म्हणजे नेतृत्वच आहे. प्रत्येकांनी आपले काम ओळखून आपले नेतृत्व गुण ओळखावे आणि आपली जबाबदारी ओळखावी आणि पुढे होऊन काम करावे जेणेकरून शासनाचे महत्वाकांक्षी उद्देश सफल होईल. 

ते पुढे म्हणाले की प्रत्येकाकडे प्रचंड क्षमता आहे. आपला आत्मविश्वास गमावू नका. चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करा,दुसरे मदतीला येतील याची अपेक्षा करू नका असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गुरव यांनी केले तर आभार हेरंबराज पाठक यांनी मानले.

Web Title: Completed the Confidence Campaign Workshop at Akkalkot