राज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर 

तात्या लांडगे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल संगणक साक्षरता अभियानांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांपैकी बहुतांश लोक डिजिटल व्यवहार करत आहेत. स्मार्टफोन वापरणे, ऑनलाइन बॅंकिंग, संगणक हाताळणे यासह अन्य बाबींची माहिती या अभियानातून दिली जात असून त्याचा लोकांना फायदा होत आहे. 
- साजिद आतार, समन्वयक, सीएससी

सोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे ठरत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक 75 हजार 735 तर नागपूरमधील 51 हजार 767 जणांनीही संगणकाचे धडे घेतले आहेत. तसेच गोंदियातील 46 हजार 388 तर सोलापूर जिल्ह्यातील 37 हजार 474 जणांनीही अभियानातून संगणक शिक्षण घेतले आहे.

जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, वर्धा, नगर या जिल्ह्यांतील 20 हजारांहून अधिक तर बुलढाणा, अमरावती, जालना, औरगांबाद, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, अकोला, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांतील 10 हजारांहून अधिक आणि वासिम, बीड, सांगली, पुणे, सातारा, पालघर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात 10 हजारांपेक्षा कमी लोकांनी संगणक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. राज्यात 2008 पासून कॉमन सर्व्हिस सेंटर योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्रांच्या (सीएससी) माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी होत आहे. 

आकडे बोलतात... 
प्रशिक्षणार्थी उद्दिष्ट 
25 लाख 
प्रशिक्षण पूर्ण झालेले 
6.23 लाख 
निधी खर्च 
18.70 कोटी 

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल संगणक साक्षरता अभियानांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांपैकी बहुतांश लोक डिजिटल व्यवहार करत आहेत. स्मार्टफोन वापरणे, ऑनलाइन बॅंकिंग, संगणक हाताळणे यासह अन्य बाबींची माहिती या अभियानातून दिली जात असून त्याचा लोकांना फायदा होत आहे. 
- साजिद आतार, समन्वयक, सीएससी

Web Title: computer literature in Maharashtra