कोरडी गटारे संकल्पनेतूनही कऱ्हाडची स्वच्छतेत आघाडी 

vategaonkar
vategaonkar

कऱ्हाड : कॉम्पलेक्ससह इमारतीतून येणारे सांडपाणी भुयारी गाटर योजनेला जो़डण्याचा उपक्रम पालिकेने कोरडी गटारे उपक्रमातंर्गत हाती घेतला आहे. मोठी कॉम्पेलक्स, बंगले आदीचे सांडपाणी थेट भुयारी गटारीशी जोडण्याचा बहुतांशी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग येथे होतो आहे. त्यासाठी सोमवार पेठेची प्रयोगिक तत्वार निवड केली आहे. सुमारे चाळीस इमारतींचे पाणी त्या द्वारे थेट घरातून येणारे सांडपाणी भुयारी गटारांशी जोडले आहे. त्यामुळे तेथील गटारे कोरडी राहणार आहे. त्यातून पावसाळ्यातील पाणी थेट वाहणार आहे. त्यामुळे ते पाणी निचरा होण्यासाठी मोठी मदतही होणार आहे. स्वच्छतेपाठोपाठ कोरडी गटार उपक्रम राबवून पालिकेने त्यातही आघाडी घेतली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकवल्यानंतर पालिका आणखी काही नविना उपक्रम हाती घेत आहे. त्यात कोरडी गटार उपक्रम राबविला जात आहे. शहरातील जेवढी गटारे आहेत. ती गटारे कोरडी करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी शहरातील सोमवार पेठ व त्या भागात प्रयोगिक तत्वार उपक्रम राबविला जात आहे. सुमारे चाळीसहून जास्त गटा सध्या कोरडी करण्यात पालिकेला यश मिळाले आहे. त्यासाठी केवळ पाच लाखांचा खर्च आला आहे. मोटी कॉम्पलेक्स, बंगल्यांतून येणारे सांडपाणी थेट भुयारी गटारांशी जोडली आहेत. त्यामुळे गटारांची स्वच्छता होणार आहे. त्याशिवाय घुस, उंदीर, मोकाट कुत्र्यांचे घराबाहेरचे वावरणे यावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. शहरी भागात घुशींचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरांचे सांडपाणी थेट गटारीत येते. त्यामुळे सांडपाण्यातील अन्नांचे कण शोधण्यासाठी तेथे घुशी वाढल्याचे वास्तव आहे. त्यामुळे उंदीरांसह झुरळाचाही त्रास होतो आहे.

अनेक ठिकाणच्या गटाराभोवती मोकाट कुत्र्यांचा रात्रीचा वावर वाढला आहे. त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्या सगळ्यावर नियंत्रण यावे, यासाठी गटार कोरडी हवी आहेत, अशी संकल्पना पुढे आली. त्याव्दारे ती मोहिम कोठे हाती घेताल येईल, अशा विचार पालिकेत झाला. त्यावेली नियोजन सबापती विजय वाटेगावकर यांनी आपल्या व़र्डात तो उपक्रम राबविण्याचा मानस बोलून दाखवलि.ा त्यासाटी पालिकेच्या मासिक बैठकीत ठराव गेण्यात आला. त्या ठरावावर विरोधक व सत्ताधारी यांच्यात चर्चाही झाली. गटारांत येणारे सांडपाणी थेट भुयारी गटारांशी जोडण्या बाबातच्या ठरावाला संमती मिळाली. त्या कामासाठी काही रकमेची तरतूद करण्यात आली. 

ड्रेनज विभागाने प्रयोगिक तत्वावर ते काम सोमवार टेफेत सुरू केले. त्यालाही चांगला प्रथिसाद मिळाला. त्यासाठी सभपाती श्री. वाटेगावकर यांनीही चांगले प्रयत्न केले. त्यांनी प्रत्येकाला जावून त्याचे महत्वा समजावून सांगितले. तेथील सुमारे चाळीसहून अधिक काम्पेल्क्स अन्य इमारतींचे सांडपाणी थेट भुयारी गटार योजेनेशी जोडले आहे. त्यामुळे हा पायल प्रोजेक्ट ठरला आहे. अनेक काम्पलेक्स थेट भुयारी गटाराशी जोडल्याने तेथील गटारे कोरडी राहू लागली आहे. त्याचा पर्यायने फायदा होतान दिसतो आहे. दाट लोकवस्तीत हा प्रयोग यशस्वी होईल, असे पालिकेला वाटत नाही. ज्या ठिकाणी लोकांना कपडे, भांडी धुण्यासाठी जागाच नाही. ती लोक रस्त्यावर धुतात. त्यावेळी ते पाणी थेट रस्त्यावर किंवा थेट गाटारात मिसळते. तेथे प्रश्न अत्यंत जटील बनणार आहे. त्यावर पर्याय काढण्यासाठी पालिका स्तरावर प्रय़त्न सुरू आहेत. वास्तविक तशी ठिकाणे शोधून त्यासाटी बृहत आराखडा आखल्यास व पालिकेच्या खर्चाच्या पातळीवर नियोजनात बसविल्यास दाट लोकवस्तीच्या ठिकाणीही असा प्रयोग यशस्वी होवू शकतो, असे त्या विबागातील जाणकारांचे मत आहे. 

सोमवार पेठेतील अनेक भागात कॉम्पेलेक्स आङेत. त्या लोकांना सांगून त्यांचे सांडपाणी थेट भुयारी गटारींशी जोडली आहेत. काही नागरीकांनीही थेट या प्रकल्पात सहभागी होवून त्यांचे सांडपाणी थेट भुयारी गटारांशी जोडले. आहेत. त्यामुळे सोमवार पेठेत राबविलेला प्रयोगीक तत्वावरील मी ज्या वॉर्डातील प्रतिनिधीत्व करतो तेथे हा प्रकल्प यशस्वी होताना दिसतो आहे. त्यात नागरीक सहभागी झाल्यानेच यश आले आहे. 

- विजय वाटेगावकर, सभापती, नियोजन समीती, कऱ्हाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com