
बेळगाव : बारावीच्या परीक्षेची सुरळितरित्या सांगता
बेळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेची सुरळीतरित्या सांगता झाली आहे. त्यामूळे शिक्षण खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र यावेळी बारावीच्या परीक्षेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.
२२ एप्रिल पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. पहिल्या पेपर पासूनच परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याची दखल घेत आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. मात्र हिजाब प्रकरण आणि इतर कारणांमुळे यावेळी परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. शेवटच्या दिवशी हिंदी विषयाचा पेपर पाढला तसेच ७०३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 265 विद्यार्थी गैरहजर राहिले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळितरित्या पार पडल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
बारावीची परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थी जून महिन्यात होणाऱ्या सिईटी परीक्षेच्या तयारीला लागणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी सीईटी महत्त्वाची असल्याने बारावी परीक्षेसह सीईटी देखील गुणवत्ता मिळविण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांकडून होत असतात त्यामुळे बारावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांकडून पुढील परीक्षेची तयारी सुरू झाली आहे.
परीक्षा उत्तमरित्या पार पडली आहे. लवकरच पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून विद्यार्थिनी आता सीईटीच्या तयारीला लागावे.
- नागराज व्ही, जिल्हा पदवीपुर्व शिक्षणाधिकारी.
परीक्षेची सांगता झाल्यानंतर आता पदवीपूर्व शिक्षण खात्याने पेपर तपासणीचे काम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार २० मेपासुन पेपर तपासणीच्या तयारीला सुरुवात होणार आहे. तर २४ मेपासून विविध केंद्रांवर पेपर तपासणीचा कामाला सुरुवात होईल, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.
Web Title: Conclusion Of 12th Standard Examination Paper Checking From 24th May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..