आगाशिव गडावरील वनव्यात लाखोंची वनसंपदा भस्म 

conflagration on Agashiv fort in karhad
conflagration on Agashiv fort in karhad

कऱ्हाड : येथील आगाशिव गडावर वनवा पेटवला जातो आहे. काही समाज कंटक गडाच्या पायथ्याला पार्ट्या करत आहेत. त्यासाटी पेटवलेल्या चुली न विझविल्याने गडावर वनवा पेटताना दिसतो आहे. काहींकडून मात्र गडाच्या परिसरात आग लावण्याचेही प्रकार झाले आहेत. सायंकाळनंतर रात्री वणवे पेटत आहेत. त्यामुळे रात्रभर पेटणाऱ्या वनव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक होते आहे. 

वनव्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतान दिसते आहे. परकिणामी आगाशिव पर्यटनस्थळाला समाजकंठकांमुळे ग्रहण लागले आहे. आगाशिवाच्या गडावर लागणाऱ्या आगीत मोठी वनसंपदा जळून खाक होताना दिसते आहे. तेथे वड, पिंपळ, लिंब यासारख्या सतरा प्रकारच्या वनौषधी वृक्ष आहेत. ते वृक्षही वनव्यात खाक होताना दिसताहेत. आत्तापर्यंत कष्टाने वाढवलेल्या झाडांसह लाखोची वनसंपदा जळून खाक झाली आहे. शासन कोट्यावधींची तरतूद करत आहे. मात्र ती वनसंपदा वाढवण्यासाठी होणारे प्रयत्नावर पाणी सोडले जात आहे. आगाशिवचा गड पर्यटनस्थळ म्हणून घोषित आहे. मात्र वनविभागाकडून तेथे अपेक्षीत सुरक्षा व्यवस्था राबविली जात नाही. परिणामी वनवे लावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. आगाशिवच्या गडावरील वनसंपदा रक्षणासाठी कठोर पावले उचण्याची गरज आहे. त्यासाटी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. जनजागृतीपासून लोकांचा सहबाग घेवून त्यावर पर्याय शोधण्यासाठी पाऊले टाकण्यासाठी विशेष उपक्रम घेण्याची गरज आहे. 

आगाशिव गड परिसर महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केला आहे. त्याच्या विकासासाठी शासनाने सुमारे 45 कोटीचा विकास अराखडाही तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या हप्त्यातील पाच कोटी निधी वर्ग होवून डोंगराला कुंपन, वानतळी, बधारे व वृक्षारोपन करण्यात आले आहे. वनविभागाकडून टँकरने पाणीपुरवठा करून हजारो झाडे वाढवली आहेत. वनविभागाबरोबरच गेली आनेक वर्षांपासून मळाईदेवी शिक्षणसंस्था व जखिणवाडी ग्रामपंचायतीने आगाशिव डोंगर परिसरात वृक्षारोपन व बिजारोपन करून यापरिसराला वेगळे रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. झपाट्याने पर्यटनस्थळ विकसीत होत असताना गेली चार दिवसात ठिकठिकाणी समाजकंटकाकडून रात्रीवेळी वणवे पेटवले जात आहेत. अशा समाजकंटकावर कारवाई करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com