निष्ठेवरून सोलापुरात रंगली कॅांग्रेस-एमआयएममध्ये जुगलबंदी

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 11 जुलै 2018

सोलापूर : खरी निष्ठा कुणाची यावरून कांग्रेस आणि एमआयएममध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. कांग्रेसमधील अल्पसंख्याक हे नेत्यांचे चमचे असल्याची टीका एमआयएमचे शहराध्यक्ष तौफीक शेख यांनी केली होती. त्यास अल्पसंख्याक विभागातर्फे जोरदार उत्तर देण्यात आले असून,
आम्ही निष्ठावान, तर तुम्ही (तौफीक) संधी साधू असल्याचा टोला लगावला आहे. निष्ठेवरून चाललेल्या या जुगलबंदीमुळे सोलापूरकरांची चांगलीच
करमणूक होत आहे. 

सोलापूरमधील कांग्रेस अल्पसंख्याक विभागातील पदाधिकारी व नगरसेवक हे चमचे आहेत. नेत्यांपुढे हांजी हांजी करणे एवढेच त्यांना येते, अशी टीका
केली होती. ही टीका कांग्रेसमधील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना चांगलीच झोंबली असून, त्यांनी तातडीने आम्ही चमचे नाही, तर निष्ठावान आहोत आणि तुम्ही संधी साधु आहात, असा पलटवार केला आहे. 

एमआयएम पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. कांग्रेसमध्ये असताना विविध पदे उपभोगली आणि आता जातीवादी पक्षाशी संधी साधून गद्दारी केली. भाजप, शिवसेना या जातीवादी पक्षांशी संधान असलेल्या एमआयएमने कांग्रेसवर निष्ठा ठेवलेल्या मुस्लिमांची अवहेलना करणे सोडून द्यावे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आमची काल निष्ठा होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे, असेही अल्पसंख्याकव पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

..त्यामुळे व्यक्त होतोय संताप
एमआयएमच्या कट्टर समर्थकांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात कांग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वीही एमआयएममधील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वगृही (कांग्रेस) प्रवेश केला आहे. आणखी काही प्रमुख कांग्रेसच्या वाटेवर आहेत, त्यामुळे अशा असंसदीय शब्दातून एमआयएमच्या शहराध्य़क्षाकडून संताप व्यक्त होत असल्याची चर्चा रंगली आहे.

Web Title: conflict between congress and mim due to loyalty