तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरूनच तंटा

अक्षय गुंड
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

उपळाई बुद्रूक : उपळाई बुद्रूक येथे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली 24 ऑगस्ट रोजी ग्रामसेभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 14 विषय या ग्रामसभेत घेण्यात आले त्यापैकी 13 विविध विषयांवर ठराव, प्रकरणे मंजुरी बाबत चर्चा करण्यात आली. चौदावा विषय हा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी होता.

उपळाई बुद्रूक : उपळाई बुद्रूक येथे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली 24 ऑगस्ट रोजी ग्रामसेभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 14 विषय या ग्रामसभेत घेण्यात आले त्यापैकी 13 विविध विषयांवर ठराव, प्रकरणे मंजुरी बाबत चर्चा करण्यात आली. चौदावा विषय हा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी होता.

यावेळी ग्रामसेवक व ग्रामसेभेचे अध्यक्ष यांनी तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी शासनाचे परिपत्रक वाचन करून दाखवले. त्यानंतर संतोष गायकवाड यांनी मल्लिकार्जुन झाडबुके यांचे तर लक्ष्मण जाधव यांनी दिपक देशमुख यांचे नाव सुचवले. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष संजय नागटिळक यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार चारित्र्य पडताळणीच्या अर्ज सादर करण्यास सांगितले असता, उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण सुरू झाला. यावेळी मल्लिकार्जुन झाडबुके यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेभेचे अध्यक्ष तथा सरपंच संजय नागटिळक यांनी झाडबुके यांची तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.

यानंतर सरपंच संजय नागटिळक यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहिर करत तेथुन निघून गेले. यानंतर  दिपक देशमुख यांच्या गटाने या निवडीवर आक्षेप घेत. ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडत ग्रामसेवक प्रकाश सावंत यांना घेराव घातला. निवडीसाठी एकच अर्ज आला होता. ग्रामसेभेचे अध्यक्ष तथा सरपंच संजय नागटिळक यांनी काय निर्णय घेतला, मला माहित नाही. अश्या अशायचे लेखी आश्वासन ग्रामसेवक सावंत यांनी दिपक देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. पोलिस बंदोबस्तात सावंत यांना तेथून माढ्याकडे हलविण्यात आले. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर दुसरीकडे मल्लिकार्जुन झाडबुके यांची निवड झाली असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष केला.

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी असलेल्या अटिची पूर्तता करण्यासाठी चारित्र्य पडताळणीसाठी मागणी केली असता. मल्लिकार्जुन झाडबुके यांनी अर्ज सादर केला. दिपक देशमुख यांनी अर्ज सादर न केल्याने झाडबुके यांची निवड झाल्याचे जाहिर केले. 
- संजय नागटिळक, सरपंच तथा अध्यक्ष ग्रामसभा उपळाई बुद्रूक

ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची निवड ही जनतेतून असुन नागरिक जे ठरवतील तो अध्यक्ष करावा. तंटामुक्ती समितीची निवडच झालेली नाही.
- दिपक देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य

Web Title: conflict for tantamukti committee s president post