पाचवडला युनिव्हर्सिटी ग्रँन्ड कमिशनच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

भुईंज - पाचवड ता. वाई येथे राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या युनिव्हर्सिटी ग्रँन्ड कमिशनच्या (UGCNEET) प्रोफेसर पदाच्या परिक्षेसाठी प्रमाणित ओळख पत्र न आणल्याने विद्य़र्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. दरम्यान ओरिजनल ओळखपत्र न आल्याने सुमारे दहा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

पाचवड ता. वाई येथे आज नँशनल टेस्ट एजन्सी तर्फे ओगान इन्फोटेक या केंद्रावर राष्ट्रीय पात्रता प्रोफोसर पदासाठी सुमारे शंभरजण (UGCNEET युनिव्हर्सिटी  ग्रँन्ड कमिशन) परीक्षा देण्यासाठी आले होते. सकाळी 9 ते दुपारी एकपर्यंत एक व दुपारी दोन ते सहा असे दोन पेपर घेण्यात येणार होते. सकाळी नऊ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र, काही विद्यार्थ्यांकडे ओळखपत्रांच्या फोटो कॉपी आढळून आल्या. त्या प्रवेश देणा-यांनी नाकारल्या व ओरिजनल कागदपत्र घेवून येण्यास सांगितले. 

दरम्यान, ओरिजनल कागदपत्र घेवून येईपर्यंत परीक्षाहॉल प्रवेशाची वेळ संपून गेल्याने परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी परीक्षार्थींनी गोंधळ घातला. काही विद्यार्थ्यांनी दारावर लाथा घालण्याचेही प्रकार केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. तर प्रवेश न मिळाल्याने काही महिला परीक्षार्थींना रडू कोसळले. परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थींनीना सातारा जिल्ह्यातील पाचवड हे केंद्र माहीती नसल्याने त्यांना ते शोधण्यास अनेक अडचणी आल्या. 

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पेपर देता आले नाहीत त्यांना पुन्हा परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थी करीत होते.

सर्व विद्यार्थांना वेळेतच प्रवेश
या केंद्रावर NTAकडून मिळालेल्या सर्व सूचनांनाचे पालन केले जाते.विद्यार्थ्यांना वेळेतच प्रवेश दिला जातो. उशिरा प्रवेश दिल्यास रजिस्ट्रेशन करण्यास अडचणी येतात त्याचा त्रास इतर परीक्षार्थींना होतो. तसेच प्रवेशासाठी ओरीजनल कागदपत्रेच स्विकारली जातात 
- गणेश तरडे, व्यवस्थापक, ओगान इन्फोटेक पाचवड

Web Title: Confusion at the fifth grade Grand Commission Examination Center