शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूरमध्ये कॉंग्रेसची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 10) निदर्शने करण्यात आली. कर्जमाफीची कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी स्वीकारले.

'शेतकरी हा अन्नदाता असून, शेतकरी जगला तर देश टिकेल. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कर्जमाफीशिवाय त्यांची परिस्थिती सुधारणार नाही. विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी दिंडी काढली होती. आता ते सत्तेवर असतानाही शेतकऱ्यांकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत,'' असे खरटमल यांनी म्हटले आहे.

Web Title: congress agitation for farmer loanwaiver