कोल्हापुरात पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

 अत्यंत अटीतटीने झालेल्या आणि संपुर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जय फटकारे व अजित राऊत विजयी झाले.

कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने झालेल्या आणि संपुर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जय फटकारे व अजित राऊत विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 28 सिध्दार्थनगर प्रभागातून कॉग्रेसचे जय पटकारे विजयी झाले. ताराराणीचे आघाडीचे उमेदवार नेपोलिन सोनुले व अपक्ष उमेदवार सुशिल भांदिगरे यांचा त्यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 55 येथून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार अजित राऊत  विजय झाले. त्यांचे शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार पियुष चव्हाण व राजेंद्र चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला

या दोन्ही प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले होते. सिध्दार्थनगर येथे 60.94 टक्के तर पद्माराजे उद्यान येथे 58. 93 टक्के मतदान झाले होते. सिध्दार्थनगर येथे 6009 मतदारापैकी 3662 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर पद्माराजे उद्यान प्रभागात 5678 मतदारापैकी 3346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCP wins in by polls in Kolhapur