हेल्मेटसक्तीच्या विरोधात सोलापुरात कॉंग्रेसची गांधीगिरी 

congress-pk.jpg
congress-pk.jpg

सोलापूर : शहरात हेल्मेटसक्ती करणे चुकीची आहे. त्याऐवजी शहराबाहेर सक्ती करावी या मागणीसाठी सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी गांधीगिरी करण्यात आली. डोक्‍यावर जर्मनच पातेलं हेल्मेट म्हणून घालून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकीवर फेरी काढण्यात आली. 

प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले व शहराध्यक्ष बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली. फेरीत सुमीत भोसले, तिरूपती परकीपंडला, प्रवीण जाधव, शरद गुमटे, राजासाब शेख, विनोद वाघमारे, राहूल गोयल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

शहरात सुरु असलेल्या हेल्मेटसक्तीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. हेल्मेट न घातलेल्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. शहरात प्रमुख रस्त्यावर दुकाने आहेत, रस्त्यावरील खड्डे, गतीरोधक, बंद पडलेले सिग्नल, प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे शहरांतर्गत होणाऱ्या वाहतुकीची मर्यादा सिमित असते. त्यामुळे शहरात अपघात होण्याचे प्रमाण कमी आहे. याउलट हेल्मेटसक्तीमुळे मंगळसूत्र चोरणाऱ्यांचे फावणार असून, असे प्रकार वाढण्याची शक्‍यता आहे. हेल्मेट घालून चेनस्नॅचिंग करणाऱ्यांची ओळख पटणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करू नये, ती ऐच्छीक करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

756 जणांना दंड- हेल्मेट न वापरल्याबद्दल 1 ते 6 ऑक्‍टोबर या कालावधीत सुमारे 756 वाहनधारकांना दंड करण्यात आला. त्यांच्याकडून सुमारे 12 लाखांच्या आसपास दंड वसूल करण्यात आला. कागदपत्रे उपलब्ध नसलेली सुमारे 350 ते 360 वाहने जप्त करण्यात आली. पाचशेच्यावर दुचाकीचालकांचा वाहनपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ही मोहिम आणखीन तीव्र करण्यात आली आहे. 

शहरात हेल्मेटसक्ती करणे चुकीचे आहे. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. त्यामुळे आधी चांगले रस्ते करावेत, वाहनधारकांना आवश्‍यक त्या सुविधा द्या. हेल्मेटसक्ती सुरुच राहिल्यास आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू. 
- अंबादास करगुळे, शहराध्यक्ष, युवक कॉंग्रेस 

हेल्मेटसक्ती ही महामार्गावर असावी, शहरात नवासी. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि वसुलीसाठी हेल्मेटसक्ती केली जात असेल तर चुकीची आहे. अपघात कमी होण्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन करावे, शहरात हेल्मेटसक्ती करून शहरवासियांना वेठीस धरू नये. 
- विनोद भोसले, नगरसेवक, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com