भाजप म्हणजे थापाड्यांचा पक्ष - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कडेगाव - अच्छे दिनच्या नावाखाली लोकांना अनेक खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपचे दिवस आता भरले आहेत. भाजप म्हणजे थापाड्यांचा पक्ष अशी भावना आता मतदारांची झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार भाजपचा हिशेब चुकता करून कॉंग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवतील. असा विश्‍वास आमदार पतंगराव कदम यांनी व्यक्त केला. 

चिंचणी (ता. कडेगाव) येथे कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, विश्‍वजित कदम, पृथ्वीराज चव्हाण, मच्छिंद्र सकटे, डॉ. मीनाक्षी सावंत उपस्थित होते. 

कदम म्हणाले,""गेल्या पंधरा वर्षांत मंत्रिपदाच्या माध्यमातून तालुक्‍याचे नंदनवन केले. अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. ताकारी, टेंभूचे पाणी आणले. विकासकामांत कुठेही राजकारण केले नाही. मात्र मोदींच्या भूलथापांना बळी पडून जनतेने भाजपच्या हाती सत्ता सोपवली. मात्र त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.'' 

मोहनराव कदम म्हणाले,""देवराष्ट्रे जि.प.गट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील कॉंग्रेसचा उमेदवार हा जिल्ह्यात विक्रमी मतांनी विजयी होणार आहे. त्यामुळे येथे विरोधकांची पळता भुई थोडी झाली आहे. विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असे भाकीत त्यांनी केले. विश्‍वजित कदम यांनी आपल्या भाषणांत राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड व शरद लाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले,""ज्याच्याशी लग्न केलं आहे त्याच्याशी निट नांदायला शिका, अशी टीका केली.'' 

यावेळी वैशाली कदम, डॉ. जितेश कदम, बाळकृष्ण यादव, मालन मोहिते, मोहनराव मोरे, पी. सी. जाधव, विजय मोहिते, आनंदराव मोरे, कैलास माने, स्मिता महिंद, विकास पवार, सुरेश शिंदे उपस्थित होते.

Web Title: Congress candidates rally