काँग्रेस समितीतर्फे सांगलीत शहीदांना श्रद्धांजली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

सांगली - जम्मू काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे या पदयात्रेत सहभागी झाले होते. 
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी शहीद स्मृतीस्तंभाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहीली. 

श्री. पाटील म्हणाले, ""शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण देशवासीय सहभागी आहेत. या हल्ल्याचे चोख प्रत्त्युत्तर देण्याची गरज आहे. अतिरेकी हल्ल्याचा काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.'' 

श्रद्धांजलीनंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक प्रकाश मुळके, मनोज सरगर, सज्जाद भोकरे, कयुम पटवेगार, अण्णासाहेब कोरे, अमर निंबाळकर, बिपीन कदम, रवी खराडे, अरूण खतीब, योगेश राणे, अमित पारेकर, श्‍वेता शेठ उपस्थित होते. 

Web Title: congress committee Tribute to the martyrs in Sangli