आघाडीबाबत काँग्रेसशी बोलणी - विलासराव शिंदे

आघाडीबाबत काँग्रेसशी बोलणी - विलासराव शिंदे

सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी समविचारी पक्ष, गटांशी चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षांशीही बोलणी सुरू होतील. पहिली बैठक बुधवारी (ता. १८) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याबरोबर आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांच्या २१ ते २३ जानेवारी काळात सांगली पक्ष कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

झेडपी, पंचायत समित्यांसाठी २१ जानेवारीला मिरज पश्‍चिम, पलूस, कडेगाव, तासगाव तालुक्‍यांच्या मुलाखती होतील. २२ जानेवारीला कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, वाळवा, तर २३ जानेवारीला शिराळा, जत, मिरज पूर्व भागांतील गट-गणांसाठी मुलाखती होणार आहेत.  श्री. शिंदे म्हणाले,‘‘ राज्यातील जातीयवादी पक्षांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पक्षाचे नेते शरद पवार यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत सुचवले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्वच नेत्यांनी त्यास अनुसरून चर्चेचे धोरण घेतले आहे. जिल्ह्यातही आम्ही काँग्रेसबरोबर पहिली चर्चा करीत आहे. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याबरोबर माझी पहिली चर्चा बुधवारी होणार आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी त्यात आणखी प्रगतीची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या झालेली वजाबाकीचा विचार करूनच आम्ही चर्चेला सुरवात करणार आहे. प्रथम आघाडीसाठीचे संकेतही महत्त्वाचे आहेत. मग जागा वाटप आणि अन्य बोलणी जसजसे पुढे जाऊ तसा मार्ग निघत जाईल. अन्य पक्षातील आणि आमच्याशी जुळवून घेणाऱ्या गटाबरोबरही चर्चा करू. त्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही चर्चा करणार आहे. शिराळ्यात काँग्रेसबरोबर कायमची आघाडी आहे.’’ यापूर्वी काँग्रेसने आघाडीला नकार दिला होता. यावर शिंदे म्हणाले, ‘‘आपण मागील विसरून ताज्या घडामोडीवर बोलतो आहोत.’’

मुलाखतींसाठी १८ जणांचे पार्लमेंटरी बोर्ड
इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी १८ जणांचे पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करण्यात आले आहे. त्यात जिल्हाध्यक्ष श्री. शिंदे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, अण्णासाहेब डांगे, इलियास नायकवडी, राजेंद्रअण्णा देशमुख, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, मनोज शिंदे, उषाताई दशवंत, स्वप्नील जाधव, अर्चना कदम, अनिता सगरे, अमरसिंह देशमुख, देवराज पाटील, रेश्‍माक्का होर्तीकर, स्नेहल पाटील, बाळासो पाटील यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com