काँग्रेस इच्छुकांचे ‘शतक’ ओलांडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

सोलापूर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे ‘शतक’ सोमवारी ओलांडले. शनिवारी पहिल्या दिवशी ९० जणांनी अर्ज नेले होते, ती संख्या सोमवारी रात्री आठपर्यंत ११५ वर पोचली होती. दरम्यान, अर्ज नेण्यासाठी विद्यमान नगरसेवकांचा ठंडा प्रतिसाद असून, प्रभाग १४ व १७ साठी आतापर्यंत सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. 

काँग्रेस भवनात सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यासाठी राजकुमार आयगोळे, लतीफ मल्लाबादकर व सुधाकर क्षीरसागर या तीन कार्यालयीन सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करतानाचे शुल्क अद्याप निश्‍चित न झाल्याने तूर्त अर्ज शुल्क आणि क्रियाशील सदस्यत्वाचे शुल्क असे २७५ रुपये घेतले जात आहेत. 

काही प्रमुख इच्छुक, कंसात प्रभाग क्रमांक ः बजरंग जाधव (सहा), मानसी हबीब, माधुरी पिसे-विभूते, मीनाक्षी बंकापूर (चार), गोविंद कांबळे (सात), सोपान थोरात (एक), अमोल बंगाळे, नागनाथ बंगाळे (सहा), सुषमा हिबारे, शकील मौलवी (आठ) रफीक हत्तुरे, तौफिक हत्तुरे, मैनोद्दीन शेख, हारून शेख, भाग्यश्री इभ्रापुरे, जुलेखा विजापुरे, मुस्कान शेख, शमा सय्यद (१४), मुश्‍ताक लालकोट, रजाक कादरी, स्वाती मनसावाले, फरिदा कुरेशी, राणूसिंग बुऱ्हाणुरे, प्रभाकर सोनवगीवाले, ॲड. सूरजसिंग लोढा, ॲड. एजाज शेख (१७), सुभाष चव्हाण (२४ व २५), युवराज जाधव, पार्वती काळे, सविता ऐवळे (२३), सरस्वती कासलोलकर, भगवान गायकवाड, कमल चव्हाण (२२), अनिल गायकवाड (२४), डॉ. अप्पासाहेब बगले, रमाकांत साळुंके (२०), शाकीर सगरे, इस्लामोद्दीन शेख, अझरोद्दीन शेख (२१).

तीन नगरसेवकांनी नेले अर्ज
रफीक हत्तुरे, अश्‍विनी जाधव आणि सरस्वती कासलोलकर या तीन विद्यमान नगरसेवकांनी अर्ज नेले.

तिघांनी भरले पैसे
अमोल बंगाळे, रमाकांत साळुंके आणि दिवंगत नगरसेवक जब्बार शेख यांचा मुलगा अझरोद्दीन शेख यांनी शुल्कासह आज अर्ज दाखल केले.

विधानसभा मतदारसंघनिहाय नेलेले अर्ज ः शहर उत्तर (३३), शहर मध्य (४४), दक्षिण सोलापूर (३८).

Web Title: Congress exceeded candidates century