पहिली यादी विद्यमानांची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्यामध्ये विद्यमान नगरसेवकांचा समावेश असेल असे सांगण्यात आले, तर ज्येष्ठांना संधी मिळेल का याची खात्री नसल्याने माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांचे लक्ष घोषणेकडे लागले आहे. 

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्यामध्ये विद्यमान नगरसेवकांचा समावेश असेल असे सांगण्यात आले, तर ज्येष्ठांना संधी मिळेल का याची खात्री नसल्याने माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांचे लक्ष घोषणेकडे लागले आहे. 

छाननी समितीने इच्छुकांचे पॅनेल तयार करून ते प्रदेश काँग्रेस समितीकडे पाठविले आहे. त्यानुसार समितीमार्फत पहिल्या यादीतील नावांची घोषणा होईल. पालिकेत सध्या काँग्रेसचे ४३ नगरसेवक होते. त्यापैकी राजकुमार हंचाटे, विनायक कोंड्याल, निर्मला नल्ला, कुमुद अंकाराम, देवेंद्र कोठे व विठ्ठल कोटा या सहा जणांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, माकपमधून माशप्पा विटे व महादेवी अलकुंटे काँग्रेसमध्ये आले. अपक्ष उमेदवार दत्तू बंदपट्टे काँग्रेस समर्थक आहेत. पहिल्या यादीत यापैकी कितीजणांना स्थान मिळते, हे बुधवारीच स्पष्ट होईल. 

माजी महापौरांना उमेदवारी नाही,अशी चर्चा मध्यंतरी होती. त्या वेळी काहीजणांनी जातीची समीकरणे श्रेष्ठींसमोर मांडली. आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसला त्याचा कसा फटका बसेल हे श्रेष्ठींच्या गळी उतरविण्यात ते यशस्वी झाले व आपली उमेदवारी निश्‍चित केली. आजच्या घडीलाही चालू टर्ममधील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळते की नाही याची खात्री नाही. ‘प्रभाग बदलण्याची तयारी ठेवा, उमेदवारीची खात्री आम्ही देऊ’ अशी भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होते की नाही हे अद्याप स्पष्ट न झाल्याने काँग्रेसने १०२ जणांची यादी तयार ठेवली आहे. इच्छित जागेवरच उमेदवारी मिळेल याची खात्री नसल्याने अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत.

युवकांतून होतेय नाराजी व्यक्त
सर्व विद्यमानांनाच उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही युवक जायचे कुठे, असा प्रश्‍न इच्छुक युवकांनी उपस्थित केला. पंधरा-पंधरा वर्षे झाली तरी पुन्हा उमेदवारी द्यायचे धोरण पक्षाने बदलले पाहिजे, अन्यथा त्याचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. अमोल शिंदे व संकेत पिसे शिवसेनेत का गेले, याचे आत्मचिंतन केले तरी पुरेसे आहे, असे मत ते व्यक्त करीत आहेत. सादिक पटेल, राहुल वर्दा, विनोद भोसले, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे व सैफन शेख हे युवक प्रामुख्याने दावेदार आहेत.

Web Title: congress first list