हातकणंगलेत कॉंग्रेसला खिंडार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

खोची - सामान्य व चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. घराणेशाही मोडीत काढण्यासाठी महाआघाडीतून बाहेर पडलो असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

खोची - सामान्य व चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. घराणेशाही मोडीत काढण्यासाठी महाआघाडीतून बाहेर पडलो असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

लाटवडे येथे कॉंग्रेसचे कार्यकर्ते अशोक माळी व कुंभोज पंचायत समितीचे सदस्य संतोष माळी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. 
खासदार शेट्टी म्हणाले, ""जिल्हा परिषदेचे आरक्षण खुले झाल्याने अनेक नेत्यांनी आपले वारसदार निवडणुकीत पुढे आणले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मागे राहिला आहे. अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चळवळीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे.'' 

कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून संतोष माळी व लाटवडे पंचायत समिती मतदारसंघातून अशोक माळी यांना या वेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

अशोक माळी म्हणाले, ""वीस वर्षे कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलो. उमेदवारीसाठी नेत्यांनी शब्द दिला होता. प्रचारासही सुरवात केली होती; परंतु ऐनवेळी दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागितलेल्या उमेदवाराला संधी दिली. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीत प्रवेश करत आहे. 

या वेळी शिवाजी माने (भादोले), शिवाजी पाटील (खोची), गब्बर पाटील, सुरेश शिर्के, दिलीप पोवार, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, राजाराम कांबळे, माणिक पाटील, शामराव पाटील, सुनील देसाई, रूपाली माळी, संतोष जाधव, किशोर पाटील, सावंता माळी, आनंदा माळी, आनंदा पाटील (नांगरे), महादेव कोळी, कृष्णात माळी, तानाजी पाटील, बापू माळी आदी उपस्थित होते.

Web Title: congress Hatkanangle