कोल्हापूरातून कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा 

कोल्हापूरातून कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा 

सांगली -  केंद्र व राज्य सरकारची थापेबाजी, खोटी आश्‍वासने आणि जाहिरातबाजीचा पर्दाफाश करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमधून कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु होईल. 31 ऑगस्ट सुरू होऊन सांगली जिल्ह्यात यात्रा त्याच दिवशी (एक सप्टेंबर) दाखल होईल. सांगली, जत, कडेगाव येथे जाहिर सभा आणि अन्य तालुक्‍यात यात्रेचे स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले,""जनसंघर्ष यात्रेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे नूतन प्रभारी खासदार मल्लीकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आजी-माजी खासदार, आमदार सहभागी होत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन 31 ऑगस्ट रोजी यात्रेला सुरवात होईल. सात किंवा आठ सप्टेंबर रोजी पुण्यात समारोप आहे. एक सप्टेंबर 2018 रोजी दुपारी इचलकरंजी येथून यात्रा सांगली जिल्ह्यात प्रवेश करेल. त्या ठिकाणी पक्षातर्फे त्यांचे स्वागत केले जाईल. सांगलीतील स्टेशन चौकात सायंकाळी सात वाजता जाहिर सभा आहे. जीएसटी, नोटाबंदी, बेकारी, महागाई, मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाच्या निर्णयात वेळकाढूपणा, चार वर्षांत खोटी आश्‍वासने आणि फसव्या घोषणा, लोकांऐवजी मोजक्‍या उद्योगपतींचा विकास, घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन, सरकार विरोधी प्रसारमाध्यमांवर निर्बंध आदी विषयांवर सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यात येईल.'' 

यात्रेच्या नियोजनाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीस विशाल पाटील, किशोर जामदार, शैलजा पाटील, नामदेवराव मोहिते, विक्रम सावंत, महादेव अंकलगी, निवास पाटील, सदाशिव खाडे पक्षाचे सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला दिवंगत नेते गुरुदास कामत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

जनसंघर्ष यात्रेचा मार्ग 
दोन सप्टेंबर- मिरज गांधी चौक, कळंबी, शिरढोण, कवठेमहांकाळ येथे स्वागत. डफळापूर व जत (जाहिर सभा), भिवघाट, विटा, कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, कडेगाव (जाहिर सभा). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com