इचलकरंजीः काँग्रेसचे नेते रवी रजूपते यांचा राजीनामा

इचलकरंजीः काँग्रेसचे नेते रवी रजूपते यांचा राजीनामा

इचलकरंजी - येथील काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष रवी रजूपते यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. 

दरम्यान, एक - दोन दिवसांत आपल्या समर्थकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे श्री.रजपूते यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मात्र ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात आहे. आगामी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे कट्टर राजकीय समर्थक म्हणून श्री. रजपूते यांची ओळख आहे. कॉंग्रेस पक्षाकडून ते तीन वेळा नगरसेवक पदावर निवडून आले होते. उपनगराध्यक्ष पदासह पालिकेतील विविध महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस पक्षाकडून उभे राहिले होते. त्यामध्ये त्यांना अपयश आल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. 

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी त्यांनी थेट शिवसेना-भाजप उमेदवार धैर्यशील माने यांना उघड पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत शहरात चर्चा सुरु झाली आहे. 

भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता 
शहरातील एक मोठा गट भाजपच्या वाटेवर आहे. त्यामध्ये श्री.रजपूते यांचेही नाव चर्चेत आले आहे. मात्र श्री.रजपूते यांनी याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीच घोषणा केलेली नाही.

""येत्या एक - दोन दिवसांत आपल्या समर्थकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेणार आहे."" 
- रवी रजपूते, 

माजी उपनगराध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com