विश्‍वासघातके चार साल; जनता हो गयी बेहाल 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 जुलै 2018

सोलापूर - "विश्‍वासघातके चार साल; जनता हो गयी बेहाल' ही संकल्पना घेऊन प्रदेश कॉंग्रेसने आठ जुलै रोजी मुंबईत संमेलन आयोजिले आहे. प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनास महाराष्ट्राचे नूतन प्रभारी तथा अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे हेही उपस्थित राहणार आहेत. 

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत, तर राज्यातील भाजप व शिवसेना सरकारला चार वर्षे पूर्ण होणार आहेत. या चार वर्षांत ही दोन्ही सरकारे अपयशी ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेस समितीने या संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सदस्य, खासदार, आमदार, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, माजी खासदार, आमदार, ब्लॉक अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील प्रमुख नेते, फ्रंटल, सेल व विभागाचे जिल्हाध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात दुपारी दोन वाजता होणाऱ्या या संमेलनात राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या संमेलनात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. नूतन प्रभारी श्री. खर्गे हे पहिल्यांदाच राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सामोरे जाणार असल्याने या संमेलनात ते काय बोलणार याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: congress meeting politics