काँग्रेस आमदाराचा राजीनामा; 'भाजप'मध्ये करणार प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीत गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा जाहीरपणे प्रचार केला होता.

मुंबई : सातारा जिल्ह्याच्या माण मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज (शुक्रवार) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीत गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा जाहीरपणे प्रचार केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची भाजप नेत्यांशी सलगी वाढलेली होती.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार गोरे राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्या शक्यतेनुसार आज आमदार गोरे यांनी  राजीनामा दिला आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Jaykumar Gore resigns from MLA