पंढरपूर : काँग्रेस आमदार रामहरी रूपनवरांचे राष्ट्रवादी प्रेम!

भारत नागणे
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. पंढरपूर, माढा, सांगोला या मतदार संघात आघाडीत बिघाडी झाली आहे. अशातच काँग्रेस आमदाराने राष्ट्रवादीच्या स्टेजवरच चक्क काँग्रेस नेते आणि पक्षाचा नामोल्लेख टाळत शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उदोउदो केले.

पंढरपूर : काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामहरी रूपनवर यांनी काॅग्रेस पक्ष आणि त्यांच्याच नेत्यांचा सोयीस्करपणे नामोल्लेख टाळून चक्क राष्ट्रवादी पक्षाचे आणि  शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून काँग्रेस आमदाराचे राष्ट्रवादी प्रेम दिसून आले.

आज (मंगळवार) अकलूज येथे शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांची जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी आमदार रूपनवर यांनी आपल्या भाषणात सोयीस्करपणे काँग्रेस नेते आणि स्वत:च्याच पक्षाचा नामोल्लेख टाळला. आमदार रूपनवरांच्या राष्ट्रवादी प्रेमामुळे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते मात्र चांगलेच आवक झाले.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. पंढरपूर, माढा, सांगोला या मतदार संघात आघाडीत बिघाडी झाली आहे. अशातच काँग्रेस आमदाराने राष्ट्रवादीच्या स्टेजवरच चक्क काँग्रेस नेते आणि पक्षाचा नामोल्लेख टाळत शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उदोउदो केले. इतकेच नाही तर राज्याला राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस आमदाराचे अचानक पवार प्रेम उफाळून आल्याने त्यांच्या कथित राजकीय  प्रेमाची आणि त्यांच्या काँग्रेस निष्ठे विषयी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र  एकच चर्चा सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLC Ramhari Rupnawar talked about NCP