अखेर "हाता'त "घड्याळ' बसले! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला कोलदांडा मिळण्याची शक्‍यता असणाऱ्या नेसरी गटात अखेर "हाता'त "घड्याळ' बसले आहे. जिल्हा परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे; तर नेसरी व बुगडीकट्टी गण कॉंग्रेसच्या वाट्याला गेले आहेत. आज या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दीपकराव जाधव, नेसरी गणातून युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे, बुगडीकट्टी गणातून इंदू नाईक यांची उमेदवारी असेल. या निवडणुकीसाठी तालुक्‍यात आकाराला आलेली ही पहिलीच आघाडी ठरली. 

आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्‍यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याची घोषणा कोल्हापुरातून केली; परंतु नेसरी गटातून कॉंग्रेसचे विद्याधर गुरबे रिंगणात येण्यास आग्रही होते. हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने कॉंग्रेसला ही जागा मिळणे अशक्‍य होते. यामुळे या आघाडीला याच गटातून मूठमाती मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. 

दरम्यान, आमदार श्री. पाटील व राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्यात आज पुन्हा आघाडीबाबत चर्चा झाली. तडजोडीच्या चर्चेत कॉंग्रेसच्या गुरबे यांनी एक पाऊल मागे घेत नेसरी जिल्हा परिषद गटासाठीचा आग्रह सोडला. त्या बदल्यात पंचायत समितीच्या दोन्ही जागा कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाला. आता नेसरी गणातून श्री. गुरबे रिंगणात येतील. 

या राजकीय घडामोडीनंतर आता नेसरी गटात चौरंगीऐवजी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे दीपकराव जाधव, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, तर भाजपाकडून ऍड. हेमंत कोलेकर रिंगणात येणार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ गृहीत धरून राष्ट्रवादीने आजरा तालुक्‍यातील कोळिंद्रे गट कॉंग्रेसकडे; तर त्याअंतर्गत दोन्ही गण स्वत:कडे ठेवले आहेत. त्याच धर्तीवर नेसरी गटातही आघाडी करत जागांची अदलाबदल केली आहे. 

नेसरीपुरतीच आघाडी मर्यादित? 
गिजवणे गटात राष्ट्रवादीच्या विरोधात कॉंग्रेसने ऍड. दिग्विजय कुराडे यांना उमेदवारी दिली आहे. भडगाव गटात कॉंग्रेसचे मानले गेलेले अप्पी पाटील यांची भूमिका संदिग्ध असली तरी त्यांच्यातर्फे उमेदवार रिंगणात येणारच आहे. हलकर्णी गटात कॉंग्रेसचे सदानंद हत्तरकी यांनी स्वाभिमानीशी आघाडी केली आहे. बड्याचीवाडी गटात कॉंग्रेसचा अद्याप एकही चेहरा पुढे आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी नेसरीपुरतीच मर्यादित राहण्याचीच अधिक शक्‍यता आहे.

Web Title: congress & ncp