बसायला जागा द्या; काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सांगलीत आक्रमक

Congress NCP corporators demands enough seating place for everyone in Sangli Municipal Corporation
Congress NCP corporators demands enough seating place for everyone in Sangli Municipal Corporation

सांगली : महापालिकेच्या दर सुधार समितीस मान्यता देण्यासाठी बोलवलेल्या महासभा विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आंदोलनामुळे गुंडाळण्यात आली. सभागृहात बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या दिल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत विरोधकांनी महापौरांसमोर जमीनवरीच ठिय्या मारला. त्यामुळे महापौर संगीत खोत यांनी इतिवृत्तावरील सर्व विषय मंजूर केल्याची घोषणा करीत सभा संपल्याचे जाहीर केले. 

पंधरा सदस्यीय दरसुधार समिती स्थापन करणे एवढाच एकमेव विषय सभा पटलावर होता. तथापि ओघानेच महापालिका क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र सभेत सत्ताधाऱ्यांना आजही काही सूर सापडला नाही.

प्रारंभीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्या स्वाती पारधी यांचा मागासवर्गीय समितीत समावेश कायद्यातील तरतुदीनुसार होत नाही. कारण त्या एसटी प्रवर्गातील आहे. त्यांना विशेष बाब म्हणून सहभागी करून घेता येईल का याची शासनाकडून मार्गदर्शन मागवण्याचा शब्द आयुक्तांनी दिला होता. त्याची आठवण करून देत गटनेते मैन्नुद्दीन बागवान यांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना धारेवर धरले. मागासवर्गीय महिला सदस्यांवर तुम्ही अन्याय करीत आहात असा हल्ला त्यांनी केला. आयुक्तांनी आपण याबाबत सकारात्मक असून आदिवासी विभागाच्या सचिवांशी संपर्क सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होईल असे अश्‍वासन दिले. त्यानंतर सभा पुढे सुरु झाली. 

थोडीफार चर्चा होईल अशी आशा वाटत असताना पुन्हा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी गेल्या महासभेत विरोधी सदस्यांना बसण्यासाठी पुरेशा जागा द्या अशी मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याबाबत महापौरांना धारेवर धरले. ते म्हणाले,"" विरोधी 37 सदस्य आहेत. सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने आहेत. मात्र त्यांना एका बाजूला बसवून सत्ताधाऱ्यांनी मात्र दोन तृतियांश जागा व्यापली आहे. सभागृहातील एका बाजुला खुर्च्या रिकाम्या आणि दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना मात्र दाटीवाटीने बसण्यास भाग पाडले जात आहे. तुम्ही आम्हास अपमानास्पद वागणूक देत आहात.'" साखळकर यांच्या या पवित्र्यावर भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी खुलासा करीत ही वस्तुस्थिती नाही. विरोधी सदस्य कोठेही बसू शकतात. त्यांना कोणीही अडवणार नाही असा पवित्रा घेतला. विरोधकांनी निषेध म्हणून महापौरांसमोर ठिय्या मारला. त्यानंतर महापौरांनी सभाच गुंडाळली. विरोधकांनी सभागृहात हाच काय तुमचा पारदर्शक कारभार असा सवाल करीत गोंधळ घातला. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. भाजप सदस्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सभागृह सोडले. 

औषध फवारणी आंदोलन 
कॉंग्रेसचे अभिजित भोसले, मनोज सरगर, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध म्हणून स्वतःच महापालिका कार्यालयाच्या आवारात डासांची औषध फवारणी केली. औषध फवारणीच्या सामुग्रीसह त्यांनी सभागृहात घोषणा देत प्रवेश केला. सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. या प्रश्‍नावर चर्चा होण्याआधीच सभा गुंडाळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com